शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अंबाजोगाई येथील लेणी होत आहेत दुलर्क्षित

By admin | Updated: October 31, 2016 05:50 IST

मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून अंबाजोगाईची ओळख आहे.

महेश चेमटे,

मुंबई- मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून अंबाजोगाईची ओळख आहे. भौगोलिक परिस्थितीने सुसज्ज असल्याने इतिहासात सातवाहन, चालूक्य, यादव, बहामनी, राष्ट्रकूट घराण्यांचे अंबाजोगाई आणि पर्यायाने बीडमध्ये प्रस्थ होते. राष्ट्रकूट काळात कर्नाटक, आंध्रप्रदेशात व्यापारासाठी अंबाजोगाई शहराचा वापर होत असे. याच्या खुणा येथील डोंगरात लेण्यांच्या रुपात पाहायला मिळतात. मात्र या लेण्यांची माहिती वा नोंद देखील राज्य पुरातत्व विभागाकडे नसल्याची धक्कादायक माहिती सेंट झेविअर्स महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ.अनिता राणे-कोठारे यांनी दिली. अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस सीमेजवळील जयंती नदीच्या काठी तीन लेणी सापडतात. त्यात २ शैव आणि एक जैन प्रकाराच्या लेणी आहेत. त्यातील शैव लेणी ही लेणी ‘हत्तीखाना’ म्हणून ओळखला जातो. बहामनी काळात हत्ती पाणी पिण्यासाठी या जागेचा वापर करत असे. पर्वताच्या उतारावरील ही लेणी पाहता पुण्यातील पाताळेश्वर लेण्यांची आठवण येते. तीन लेण्यांपैकी एक शैव लेणी काळाच्या पडद्याआड गेली असून; एक जैन आणि एक शैव लेणी तुर्तास तरी पाहण्याजोगे असल्याचे कोठारी यांनी सांगितले. शैव लेणीमध्ये सभामंडप, एका कातळात कोरलेला नंदी मंडप दिसून येतो. गर्भगृहाबरोबर वास्तव्य करण्यासाठी ३ खोल्या देखील आहेत. चार ओळींमध्ये आठ खांबावर (३२ खांब) लेण्यांचा भार आहे. लेण्यांसमोरील मोकळ््या जागेत मोठ्या पाषणातील चार हत्ती आहेत. चार ही बाजूने प्रवेश करता येण्याजोगे नंदीमंडप येथील आकर्षण ठरते. शेजारील तुटलेला ध्वजस्तंभ गतवैभवाची आठवण करुन देतो. सप्तमात्रिका, तांडव करणारा शिव, महिषासूरमर्दिनी, भैरव, वामन अवतार, त्रिविक्रम, नरसिंह आणि शेषशाही विष्णू यांची शिल्पे पाहताना एलोरा येथील शिल्पांची जाणीव होते. वास्तू दुलर्क्षित असल्याने शिल्पांना मोकळ््या श्वासाची गरज असल्याचे मत कोठारी यांनी व्यक्त केले.जैन धर्माच्या इतिहासाची ओळख करुन देणारी लेणी येथे दिसून येते. लेण्यांच्या तीन बाजूस मोकळ््या जागेत मोठे मंडप आहेत. मंडपात पूजा करण्यासाठी जैन तीर्थंकरांची कोरलेली शिल्पे आहेत. मंडपात काळ््या पाषाणात एकाच लांबीचे दोन कोरलेले हत्ती आहेत. त्यांपैकी एक हत्ती अपूर्णावस्थेत दिसून येतो. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्याने वा अनुदान न मिळाल्याने ती अपूर्ण राहिल्याचे मत लेणी अभ्यासकार आणि जाणकार नोंदवतात. लेण्यांच्या उजव्या बाजूला तीर्थंकर तर डाव्या बाजूला पार्श्वनाथ यांचे भग्नावशेष दिसून येतात. जयंती नदीच्या पुरामुळे यांची हानी होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.मंडपात १३ जैन तीर्थंकर, पार्श्वनाथ यांची बैठी प्रतिकृती, उभे तीर्थंकर लेण्यांच्या सौंदर्यात भर घालतात. त्याच बरोबर काताळात मोठ्या प्रमाणात कोरीव काम केल्याचे दिसते. किंबहूना राष्ट्रकुट काळातील व्यापार व्यवस्थेचे चित्रण काताळात रेखाटण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. घोड्यावरील पुरुषांसह विषम संख्येतील स्त्री-पुरुष व्यापार करत असल्याचे तर्क जाणकार लावतात. लातूरमध्ये या लेण्याची साधर्म्य असणारी ‘खरोसा’ची लेणी आहे, असे कोठारी यांनी सांगितले. (क्रमश:).