आयएएस अधिकारी डी. के. रवी यांनी सोमवारी बंगळुरातील आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेतल्याचे आढळले. त्यानंतर कर्नाटकात मोठे वादंग निर्माण झाले. प्रथमदर्शनी त्यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचे पोलीस मानत असले, तरी त्यांच्या प्रामाणिक आणि धडाकेबाज कामगिरीमुळे अनेकांना त्यांचा मृत्यू संशयास्पद वाटतो आहे. त्यांचा मृत्यू हा येथील भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याची आकस्मिक अखेर ठरली आहे.बंगळुरूतील रस्ते, सोशल मीडिया, विधानसौद ते दिल्लीतील संसद भवन असे एकही ठिकाण नाही, जेथे डी. के. रवी यांच्या मृत्यूविषयी संताप व्यक्त करून आंदोलने होत नाहीत. भ्रष्टाचाराविरोधात ठाम भूमिका घेऊन त्याच्याशी दोन हात करण्याच्या वृत्तीमुळेच रवी यांनी सामान्य कन्नडिंगाच्या हृदयात स्थान मिळविले. आपल्या अल्प कारकिर्दीत त्यांनी अनेक धडाडीचे निर्णय आणि कामे केली. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबद्दल अनेकांच्या मनात संशय आहे.२००९च्या आयएएस बॅचचे अधिकारी असणाऱ्या डी. के. रवी यांचे नाव कोलार आणि तुमकुरू या त्यांच्या मायभूमीत चांगलेच प्रसिद्ध आहे. कोलारचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी भूमाफिया, वाळूमाफियांविरोधात मोहीम उघडली. सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे हटवून त्या घेतल्या. त्याचप्रमाणे कोलार जिल्ह्यातील मागास, दलितांसाठी उल्लेखनीय काम केले. दलितांच्या घरी जाऊन जेवणे, स्थानिक लोकांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या त्यांच्या सवयीमुळे ते कोलारमधील अवघ्या एक वर्षाच्या कारकिर्दीत लोकांच्या गळ्यातील ताईत बनले. महसूल अदालत आणि पोडी अदालत या कार्यक्रमांमुळे हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचे रेकॉर्ड मिळवण्यात मदत झाली. त्यांचे हे काम कोलार मॉडेल म्हणून प्रसिद्ध झाले होते. आॅक्टोबर २०१४मध्ये राजकीय दबावातून त्यांची कोलारहून बढती देऊन बदली करण्यात आली. बदलीविरोधात लोकांनी नाराजी व्यक्त करत त्या वेळी आंदोलनदेखील केले होते.संकलन : असिफ कुरणेपरिचयच्डी. के. रवी (१०/६/१९७९-१६/३/२०१५)च्जन्मस्थळ : तुमकूरच्२००९मध्ये आॅल इंडिया रँकिंगमध्ये३४वे स्थान मिळवत आयएएस च्आॅगस्ट २०११मध्ये गुलबर्गा येथे पहिली नेमणूक (सहआयुक्त)च्आॅगस्ट २०१३ ते आॅक्टोबर २०१४- कोलार जिल्ह्याचे जिल्हाधिकारीच्आॅक्टोबर २०१४ ते १५ मार्च २०१५- अतिरिक्त आयुक्त, व्यावसायिक कर विभागतपास सीबीआयकडे!कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे ठरवले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीं यांनी याबाबत हस्तक्षेप करून सिद्धरामय्या यांना तपास सीबीआयकडे देण्याचा सल्ला दिला होता.प्रेमप्रकरणाची किनार : डी.के. रवी यांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली असावी असादेखील कयास आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी आपली आयएएस मैत्रीण रोहिणी दसारी यांना ४४ वेळा फोन केल्याची गोष्ट पुढे आली आहे. रोहिणी विवाहित असून, त्यांचे पती सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. रोहिणी आणि रवी हे दोघे आयएएसमध्ये टॉपर होते.डिसेंबर २०१४ज्वेलरी उद्योगाशी संबंधित६७ कार्यालयांवर छापे .४ डिसेंबर २०१४३३ सिनेमागृहांची करचुकवेगिरी उघड केली४ जानेवारी २०१५२५ बेकायदेशीर दुकाने आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सविरोधात कारवाई४ फेब्रुवारी २०१५रिअल इस्टेट क्षेत्रातील करचुकवेगिरीविरोधात मोठ्या कारवाईची तयारी
एका लढ्याची आकस्मिक अखेर...
By admin | Updated: March 22, 2015 01:03 IST