शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

कॅशलेस, पेपरलेसच्या दिशेने प्रवास सुरू !

By admin | Updated: January 1, 2017 02:06 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने अग्रक्रमाने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले आहे. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम गेल्या दीड महिन्यातच

- अरुणा सुंदरराजन नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने अग्रक्रमाने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले आहे. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम गेल्या दीड महिन्यातच दिसू लागले आहेत. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने, डिजिटल व्यवहार प्रशिक्षण अभियान वेगाने राबवण्याचा उपक्रम सुरू केला असून, देशातल्या ४७६ जिल्ह्यांत २,२७५ ब्लॉक्समध्ये ३.५0 लाख दुकानदारांना व सुमारे १ कोटीपेक्षा अधिक लोकांना या काळात डिजिटल व्यवहार साक्षर बनवण्यात यश प्राप्त केले आहे. भारताच्या सर्वदूर ग्रामीण क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिन असलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटर्स (सीएससी) व्दारा डिजिटल व्यवहार प्रशिक्षण अभियानाद्वारे लोकांना प्रशिक्षित केले जात आहे. विशेष म्हणजे, नोंदणीकृत प्रशिक्षणप्राप्त ६0 टक्के ग्रामीण नागरिकांनी दीड महिन्यात खरेदी केलेल्या वस्तूंसाठी मुख्यत्वे ई-वॉलेटचा वापर केला आहे. भारतात कॅशलेस व्यवस्था रुजण्यास थोडा अवधी लागेल, हे खरे मात्र जनतेने खुल्या दिलाने या व्यवस्थेचे स्वागत केले आहे. क्रेडिट, डेबिट कार्ड्स, ई-वॉलेट, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा (यूएसएसडी) आणि कार्ड स्वाइप करणारी पॉइंट आॅफ सेल (पीओएस) मशिन्स ही भारतात उपलब्ध कॅशलेस माध्यमे आहेत. त्याद्वारे होणाऱ्या कॅशलेस व्यवहारांमध्ये अवघ्या दीड महिन्यात कि त्येक पट वाढ झाली आहे. डिजिटल पेमेंटसमधे वृद्धी होण्यासाठी लोकांना सर्वप्रथम या व्यवहारांच्या सुरक्षिततेची हमी आवश्यक वाटते. त्यासाठी डिजिटल पेमेंट्सच्या सायबर सिक्युरीटीबरोबरच कायदेशीर यंत्रणेची स्थिती काय आहे, त्याचे मंत्रालयाने सूक्ष्म अवलोकन चालवले आहे. काही मुद्दे असे आहेत की, ज्यात अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. कॅशलेस व्यवहारांना उत्तेजन देताना असे व्यवहार सोपे, सोईस्कर आणि सुटसुटीत असले, तर लोक ते लवकर स्वीकारतील. यासाठीच या क्षेत्रात मंत्रालय नव्या तंत्रज्ञानाला अधिक प्रोत्साहन देत आहे. कॅशलेस व्यवहारांमध्ये निअर फिल्ड कम्युनिकेशन, बायोमेट्रिक एनेबल्ड स्मार्ट फोन्स, यूएसएसडी एनेबल्ड मोबाइल बँकिंग, या पर्यायांचा कसा वापर करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नव्या तंत्रज्ञानाने सज्ज मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स तयार करण्याचे काम अनेक स्टार्ट अप्सनी सुरू केले आहे. भारताच्या ग्रामीण भागात आमच्या मंत्रालयाच्या अधिन असलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटर्सच्या माध्यमातून डिजिटल व्यवहार साक्षरांची नोंदणी आम्ही वेगाने सुरू केली आहे. कॅशलेस व्यवहारांबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण करणेही आवश्यक आहे. त्यासाठी टेलिव्हिजन वाहिन्यांच्या माध्यमातून मंत्रालयाने ‘डिजिशाळा’ कार्यक्रम सुरू केला आहे. याखेरीज डिजिटल पेमेंट्सविषयी सारी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल, अशी नॉलेज रिपोझेटरी वेबसाइटही सुरू करण्यात आली आहे.

टेलिकॉम आॅपरेटर्ससह तमाम बँकांनीही आपले नेटवर्क अधिक सक्षम करावे, यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बँक अधिकाऱ्यांबरोबर गेल्याच सप्ताहात बैठक घेतली. अर्थमंत्री अरुण जेटली आणि प्रसाद यांच्याबरोबरही या संदर्भात संबंधितांच्या बैठका सुरू आहेत. डिजिटल इंडिया ला अभिप्रेत असलेले सारे तांत्रिक प्रयत्न एकदा का मार्गी लागले, तर भारताचा केवळ कॅशलेसच नव्हे, तर पेपरलेस आणि फेसलेस गव्हर्नन्सच्या दिशेने लवकरच प्रवास सुरू होईल.अनेकदा इंटरनेटचे नेटवर्क नीट काम करीत नाही, बँकांचे सर्व्हर्स डाउन असल्याने, डिजिटल पेमेंट्सच्या पायाभूत सोयींमध्येच अडथळे निर्माण होतात. त्यातून क्वचित दोनदा रक्कम कापली जाणे, संबंधिताकडे लगेच रक्कम न पोहोचणे असे प्रकार घडतात. ग्राहकांमध्ये त्यामुळे भीतियुक्त चिंतेचे वातावरण आहे, याची मंत्रालयाला जाणीव आहे. कॅशलेस व्यवहार सुरळीतपणे पार पाडतांना काही प्रसंगी बेसिक टेलिकॉम नेटवर्कमध्ये बाधा उत्पन्न होणे, व्हिसा/मास्टर कार्डची स्वीच लेव्हल अचानक बंद पडल्यामुळे, व्यवहारात बाधा येणे अथवा बँकांचे सर्व्हर्स डाउन असले, तर त्यामुळेही व्यवहारात व्यत्यय येणे असे प्रकार घडतात. अशा वेळी सर्व्हिस प्रोव्हायडर असे अडथळे दूर करण्यासाठी त्वरेने कार्यवाही करतात. कारण दर सेकंदाला त्यांचे उत्पन्न बुडत असते. अशा प्रसंगात मंत्रालयाने त्यात लक्ष घालावे, अशी वेळ क्वचितच येते.ई वॉलेटस् सुरक्षित करणारदीड महिन्यात ई-वॉलेटसचा वापर वाढला. मात्र, व्यवहारांच्या सुरक्षिततेबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. अशा व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी कायदेशीर यंत्रणेचे जोपर्यंत कसोशीने पुनर्विलोकन होत नाही, तोपर्यंत ई-वॉलेट व्यवहारांच्या सुरक्षिततेच्या हमीसाठी अन्य उपाय शक्य आहेत काय? हा प्रश्न सध्या वारंवार विचारला जातो. या संदर्भात मंत्रालयातर्फे इतकेच नमूद करावेसे वाटते की, अद्ययावत कायदेशीर यंत्रणा लवकरात लवकर कशी कार्यरत होईल, याचे पुरेपूर प्रयत्न अग्रक्रमाने सुरू आहेत. डिजिटल पेमेंट्स करणाऱ्या ग्राहकांच्या आर्थिक तक्रारींचे निवारण, तूर्त संबंधित सर्व्हिस प्रोव्हायडरलाच करावे लागणार आहे. तथापि, ही सेवा प्रदान करणाऱ्यांचे उत्तरदायित्व व कायदेशीर जबाबदारी निश्चित करण्यासाठी मंत्रालयातर्फे आवश्यक त्या सर्व कायदेशीर तरतुदी उपलब्ध असतील. बँकेशी संलग्न मोबाइल वॉलेट्समध्ये बँक व वॉलेट दरम्यान पूर्णत्वाने अंत:कार्यकारी काम करण्याची क्षमता येईपर्यंत तत्त्वानुसार काम करणाऱ्या यंत्रणेला अनुमती देण्याचा निर्णय रिझर्व बँक व मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीनंतर झाला आहे. बाजारपेठेत आजमितीला १) बँकांनी स्वत: दिलेले २) टेलिकॉम कंपन्यांनी दिलेले उदा. एअरटेल मनी, जिओ मनी इत्यादी आणि ३) पेटीएम, मोबिक्विक, फ्री चार्ज इत्यादी, असे ३ प्रकारचे मोबाइल वॉलेट्स सध्या उपलब्ध आहेत.कॅशलेस व्यवहारांमध्ये अवघ्या दीड महिन्यात कि त्येक पट वाढ कॅशलेस माध्यम८ नोव्हे. १६२६ डिसें. १६रुपे कार्ड३.८५ लाख२१ लाखदैनंदिन व्यवहार ३९.१७ कोटी २८२ कोटी ई-वॉलेट२२ लाख७५ लाखदैनंदिन व्यवहार८८.00 कोटी२९३ कोटीयूपीआय३७२१७६६८१दैनंदिन व्यवहार१.९३ कोटी३५ कोटीयूएसएसडी९७४७९६दैनंदिन व्यवहार१ लाख५७ लाखपीओएस५0.२ लाख९८.१ लाखदैनंदिन व्यवहार१२२१ कोटी१७५१.३कोटी

(लेखिका केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिव आहेत.)शब्दांकन : सुरेश भटेवरा