शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

भ्रष्टाचारही झाला कॅशलेस! आरटीओत रिक्षा परवाना मुलाखतीसाठी स्वीकारली कॅशलेस लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 03:39 IST

रिक्षा परवान्यासाठी (परमीट) प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मुलाखतीची तारीख मिळवून देण्यासाठी एक बहाद्दर चक्क पेटीएमवरून कॅशलेस लाच स्वीकारत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आली आहे.

विशाल शिर्के पुणे : रिक्षा परवान्यासाठी (परमीट) प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मुलाखतीची तारीख मिळवून देण्यासाठी एक बहाद्दर चक्क पेटीएमवरून कॅशलेस लाच स्वीकारत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आली आहे. विशेष म्हणजे, आलेले अर्ज नोंदवून मुलाखतीची माहिती नोंदविणाºया एका राष्ट्रीय पातळीवरील माहिती केंद्राच्या कार्यालयातूनच हा प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे.राज्य सरकारने रिक्षा परवाने खुले केल्यानंतर, परवाना मिळविण्यासाठी नागरिकांची रांग लागली आहे. शनिवारी (दि. ५) रात्रीपर्यंत आरटीओकडे तब्बल १० हजार अर्ज दाखल झाले होते. या अर्जाची प्रक्रिया ही आॅनलाईन आहे. आॅनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित अर्जदाराला आरटीओकडे मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्यात अर्जाबरोबर जोडलेल्या वाहन परवाना, बॅज, नामनिर्देशन पत्र, पोलिसांचा चारित्र्य पडताळणी अहवाल, रहिवासी दाखला, शळा सोडल्याचा दाखला याच्या मूळ प्रतींची तपासणी केली जाते.याबाबत माहिती देताना सीताराम मेमाणे म्हणाले, की गेले चार-पाच दिवस मी माझ्या अर्जाची परस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होतो; मात्र त्याबाबत काहीच कळत नव्हते. काही दिवसांपूर्वी मला संदीप सानप या व्यक्तीचा फोन आला होता. त्याने दोनशे रुपयांत काम करून देतो, असे सांगितले होते. त्या व्यक्तीशी संपर्क साधून पेटीएमवरून पैसे पाठविले. लगेचच मुलाखतीची तारीखदेखील कळाली.हजारो अर्ज; पण शंभर मुलाखतीआरटीओकडून शंभर जणांना दररोज मुलाखतीसाठी बोलावले जाते. अर्जदारांच्या अर्जाची नोंदणी झाल्यानंतर संबंधित अर्जदाराला मुलाखतीच्या तारखेचा एसएमएस पाठविला जातो. तसेच, परिवहनच्या संकेतस्थळावरुन संबंधिताला या मुलाखतीची प्रत देखील काढता येते.हजारोने आलेले अर्ज आणि दररोज शंभरच जणांची मुलाखत होणार असल्याने आत्ताच्या दाखल अर्जानुसार (दहा हजार) देखील शंभर कार्यालयीन कामाचे दिवस लागतील.याच अडचणीचा फायदा घेऊन एक व्यक्ती संदीप सानप या नावाने रिक्षाचालकांना फोन करुन, मुलाखतीची तत्काळ तारिख देण्यासाठी दोनशे रुपयांची मागणी करीत आहे.याबाबत लोकमतकडे काही रिक्षाचालकांनी तक्रार केली होती. त्याप्रमाणे रिक्षाचलाकाच्या सहाय्याने लोकमतने त्या व्यक्तीशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. त्यात या सानप नावाच्या व्यक्तीने मुलाखतीची तारीख मिळवून देण्यासाठी दोनशे रुपये पेटीएम करायला लावले. त्यानंतर तुम्हाला मुलाखतीचा एसएमएस येईल, असे सांगितले. त्यानुसार दोनशे रुपये दिल्यावर लगेचच मुलाखतीची १९ सप्टेंबर ही तारीख एसएमसद्वारे अर्जदाराला मिळाली.डाटा ऐंट्री करणारे कर्मचारी जाणूनबुजून नोंदणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. चक्क अर्जदारांना फोन करुन, काम करुन देण्यासाठी दोनशे रुपये मागगितले जात आहेत. खरेतर, आरटीओने पारदर्शक कारभारासाठी आॅनलाईन अर्ज प्रणाली आणली आहे. मात्र, आॅनलाईन कारभार देखील भेदता येऊ शकतो, हेच या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या मुळे आरटीओच्या आॅनलाईन परवाना आणि इतर सेवेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.- संजय कवडे, अध्यक्ष पुणे शहर (जिल्हा) वाहतूक सेवा संघटना

असा झाला संवाद!अर्जदार : तुम्ही माझे काम करुन देणार होता ना?सानप : नाव सांगा. कुठून बोलताय?अर्जदार : मेमाणेसानप : तुम्ही आले नाहीत तेव्हाअर्जदार : दोन दिवस इथे नव्हतोसानप : बरं, परवाना क्रमांक सांगाअर्जदार : एमएच १२ ....सानप : तुम्हाला दोनशे रुपये चार्जेस सांगितले होते ना ?अर्जदार : दोनशे रुपये कसे द्यायचे ?सानप : माझ्या या क्रमांकावर (मोबाईल) पेटीएम करा. मुलाखतीच्या तारखेबाबत काही अडचण आल्यास सायंकाळी फोन करा !शनिवारी सायंकाळपर्यंत रिक्षा परवान्यासाठी दहा हजार अर्ज दाखल झाले होते. अर्ज केल्यानंतर त्याची नोंदणी राष्ट्रीयकृत माहिती केंद्रातून केली जाते. आरटीओ कार्यालय दररोज शंभर मुलाखती घेते. त्यानुसार मुलाखतीच्या दिवसांचे नियोजन केले जाते. संगणकीय प्रणालीमार्फत हे काम होत असल्याने, यात त्रुटी असण्याची शक्यता संभवत नाही. भ्रष्ट प्रकार घडला असल्यास, संबंधिताला तत्काळ निलंबितच केले पाहिजे.- बाबासाहेब आजरी,प्रादेशिक परिवहन अधिकारी