शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जळीत प्रकरणात पीडित महिलेस राज्यात प्रथमच मिळाला ‘मनोधैर्य’ योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 04:42 IST

महेश सायखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ज्वलनशील पदार्थ टाकून पेटविल्याच्या हल्ल्यासंदर्भात कुठल्याही योजनेत मदतीची तरतूद नसल्याने हिंगणघाट ...

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ज्वलनशील पदार्थ टाकून पेटविल्याच्या हल्ल्यासंदर्भात कुठल्याही योजनेत मदतीची तरतूद नसल्याने हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील पीडितेस शासनाच्या कुठल्या योजनेतून शासकीय मदत द्यायची हा प्रश्न संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेसमोर पडला होता. त्यावर वर्धा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने तोडगा काढत ‘मनोधैर्य’ योजनेत हिंगणघाट येथील प्रकरणाचा समावेश करून पीडितेस शासकीय मदत मंजूर केली आहे. वर्धा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा हा निर्णय राज्यातील प्रथम असून तो इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे विधी तज्ज्ञांनी सांगितले.पीडितेच्या औषधोपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय निधीतून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. तशा सूचनाही दिल्या. पीडितेला शासकीय मदत देण्यासाठी मनोधैर्य योजनेच्या आठ पानांच्या नियमावलींचा आढावा घेण्यात आला. त्यात केवळ अ‍ॅसिड हल्ल्याचा उल्लेख होता. त्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत वर्धा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने अ‍ॅसिडच्या तुलनेत ज्वलनशील पदार्थ टाकून पेटविल्याची दाहकता आणि भीषणता लक्षात आणून दिली. त्यानंतर निर्णय झाला.अवघ्या तीन दिवसांत मदत मंजूर४ फेब्रुवारीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे प्रस्ताव येताच तीन दिवसांत पीडितेला शासकीय मदत मंजूर झाली. ती सोमवारपर्यंत पीडितेच्या वडिलांच्या बँक खात्यात जमा होईल.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप ग. मुरूमकर यांच्या मार्गदर्शनात शासनाच्या इतर योजनांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यानंतर मनोधैर्य योजनेतून पीडितेसाठी शासकीय मदत मंजूर करण्यात आली आहे. सात दिवसांची कालमर्यादा असताना प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर सर्व बाजू तपासून अवघ्या तीन दिवसांत प्रकरण मंजूर करण्यात आले.- निशांत परमा,सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा.