शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला जिवंत जाळल्या प्रकरणी तिघाजणांना जन्मठेपेची शिक्षा

By admin | Updated: July 22, 2016 18:54 IST

जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघा जणांनी चाळीस वर्षीय महिलेच्या अंगावर रॉकेल टाकुन जिवंत जाळल्या प्रकरणी दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायधीश एस. व्ही. हंडे यांनी तीन

ऑनलाइन लोकमत

बीड, दि. 20 - जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघा जणांनी चाळीस वर्षीय महिलेच्या अंगावर रॉकेल टाकुन जिवंत जाळल्या प्रकरणी दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायधीश एस. व्ही. हंडे यांनी तीन आरोपींना जन्मठेपेची ( अजन्म कारावास) शिक्षा व प्रत्येकी पाचशे रुपायांंचा दंड ठोठावला.     केज तालुक्यातील उमरी येथील वर्षा गिणा मुळे (वय ४० वर्षे ) या १९ एप्रील २०१५ रोजी पहाटे तीन वाजता पीठाची गिरणी चालु करण्यासाठी उठल्या. त्यावेळेसच गावातीलच भारत वामन मुळे, धनराज वामन मुळे व मनिषा संपती मुळे यांनी वर्षाला घराबाहेर बोलावले. त्या ठिकाणी धनराज व भारत रॉकेलचा कॅन घेऊन उभा होते. आता तुला जिवेच मारतो म्हणुन भारतने वर्षाच्या अंगावर रॉकेल टाकले. धनराज ने काडी पेटवुन दिले. यात ती ८८ टक्के भाजली होती. तिला केजच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाठवले. उपचारा दरम्याण जखमी महीलेचा व तिचा मुलगा निखीलचा मृत्युपुर्व जवाब पोलिस व कार्यकारी दंडाधिका-यासमोर नोंदवला. या जवाबावरुन केज पोलिसात गुन्हा नोंद झाला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. एस. चव्हाण यांनी करुन दोषारोपपत्र अंबाजोगाईचे जिल्हा व सत्र न्यायधीस एस. व्ही. हंडे यांच्यासमोर सुनावणीसाठी आले. सरकार पक्षाच्यावतीने नऊ साक्षीदार तपासले. यात मुत्युपुर्व जवाब व मयत महीलेच्या मुलाचा जवाब ग्राह्य धरुन न्या. एस. व्ही. हंडे यांनी भारत वामन मुळे, धनराज वामन मुळे व मनिषा संपती मुळे या तिघांना दोषी ठरवत जन्मठेपेची (अजन्म कारावास) शिक्षा व प्रत्येकी पाचशे रुपायांचा दंड ठोठावला. सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. लक्ष्मन फड यांनी काम पाहीले त्यांना अ‍ॅड. आर. एस. राख यांनी सहकार्य केले.