ऑनलाइन लोकमतअमळनेर, दि. २१ : माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांची बदनामी केली म्हणून समाजसेविका अंजली दमानिया विरुद्ध भाजपाचे माजी शहराध्यक्ष लालचंद सैनानी यांनी अमळनेर न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला आहे.अंजली दमानिया यांनी प्रसाद माध्यमांना बातमी देताना माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.याचप्रमाणे भाजपाचा ‘न खाऐंगे न खाने देंगे’ या राष्ट्रीय धोरणाची टिंगल केली. यासह अनेक आरोप करुन बदनामी केली म्हणून लालचंद सैनानी यांनी अॅड.शशीकांत पाटील यांच्यामार्फत भादंवि ४९९,५०० प्रमाणे अमळनेर न्यायालयात खटला (क्र.४०७/१६) दाखल केला आहे.
अंजली दमानियाविरूद्ध अमळनेर न्यायालयात खटला
By admin | Updated: July 21, 2016 21:15 IST