शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

व्यंगचित्रे रोजच सुचतात, पण... - राज ठाकरे

By admin | Updated: April 17, 2016 02:10 IST

व्यंगचित्र काढायला वेळ मिळत नाही, पण व्यंगचित्र रोज सुचतात, कारण आपला देशच तसा आहे. वर्तमानपत्रांच्या प्रत्येक पानावर व्यंगचित्र दिसते खरे, पण मी व्यंगचित्रे काढले तर छापायचे

मुंबई : ‘व्यंगचित्र काढायला वेळ मिळत नाही, पण व्यंगचित्र रोज सुचतात, कारण आपला देशच तसा आहे. वर्तमानपत्रांच्या प्रत्येक पानावर व्यंगचित्र दिसते खरे, पण मी व्यंगचित्रे काढले तर छापायचे कुठे? हा प्रश्न निर्माण होतो. बाळासाहेबांमुळे सवय लागली आहे की, व्यंगचित्रांमध्ये भूमिका असली पाहिजे. मात्र, आता भूमिका मांडली की, अनेक वर्तमानपत्रांना त्रास होतो. त्यामुळे सोशल मीडिया माध्यम बरे आहे, त्यावर टाकले की जगभर पोहोचते,’ अशा परखड शब्दांत मनसे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी फटकारे ओढले.अखिल भारतीय व्यंगचित्रकार संस्था ‘कार्टूनिस्ट्स कंबाइन’ आयोजित ‘व्यंगदर्शन २०१६’ हा व्यंगचित्रकारांच्या संमेलनाचा पहिला दिवस शनिवारी पार पडला. या वेळी व्यंगचित्रकला क्षेत्रातील नवोदितांना मार्गदर्शन करताना व व्यंगचित्रकला क्षेत्रातील आपला प्रवास राज ठाकरे यांनी उलगडला. व्यंगचित्र ही चित्रकलेची पहिली नव्हे, तर अखेरची पायरी आहे. या क्षेत्रातील नवोदित व्यंगचित्रकारांनी रिअ‍ॅलिस्टिक ड्राइंग आणि अ‍ॅनाटॉमी यांचा अभ्यास केला पाहिजे. तोसुद्धा केवळ माणसांचा नव्हे, तर प्राण्यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)चुकलो तर ओरडतील : आजही व्यंगचित्र काढताना, खासकरून स्केचिंग करताना सतत मनावर दडपण असते की, कुठूनतरी बाळासाहेब आणि माझे वडील बघत असतील. मी चुकलो तर मला ओरडतील, अशी मनात धास्ती असते. त्यामुळे मी जास्तीत जास्त योग्य प्रकारचे काम करण्याकडे कल असतो, असे राज यांनी सांगितले.बाळासाहेबांची लाइन अप्रतिमबाळासाहेबांची व्यंगचित्र काढण्याची लाइन अप्रतिम होती. बाळासाहेब जेव्हा स्केच करत, तेव्हा ते पुन्हा-पुन्हा पाहावे लागायचे. ते एकदाच रेषा काढायचे, तीच अंतिम असायची. त्यानंतर मग इंकिंगला बसायचे, माझ्यावरही तसेच संस्कार झाले आहेत. स्केच काढून झाले की, बाळासाहेब उठून १०-१५ मिनिटे फिरून यायचे. त्यानंतर काढलेले चित्र भिंतीला उलटे ठेवून पाहायचे, मग त्यात चित्रांतील चुका दिसतात आणि चित्रातील समतोलाचा अंदाज येतो. मग चुका सुधारून इंकिंग करायला घ्यायचे. तोपर्यंत इंकिंगला हात लावायचा नाही, हेच संस्कार आहेत. गुढीपाडव्याला व्यंगचित्रे काढून झालीगुढीपाडव्याच्या सभेला १०-१२ व्यंगचित्रे काढून झालेली आहेत, पण ती कागदावर उतरवायला वेळ मिळाला नाही. तोंडाच्या वाटेने येणाऱ्या गोष्टी वेगळ््या असतात आणि चित्राच्या वाटेने येणाऱ्या गोष्टी वेगळ््या असतात. त्यामुळे ते चित्ररूपात मांडायला वेळ लागेल, पण दाखवेन नंतर तुम्हाला, असे आश्वासन राज यांनी या वेळी दिले.