शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश गवई म्हणाले- पहलगाम विसरू शकत नाही
3
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
4
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
5
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
6
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
7
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
8
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
9
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
10
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
11
लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
12
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
13
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
14
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
15
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
16
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
17
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
18
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
19
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

‘अँस्पायर’च्या रूपात मिळाला ‘करिअर गुरू’

By admin | Updated: June 9, 2014 01:21 IST

‘लोकमत’ समूहातर्फे आयोजित मोशन प्रस्तुत आणि व्हसिर्टी सहप्रायोजित ‘लोकमत अँस्पायर एज्युकेशन फेअर-२0१४’’चा रविवारी समारोप झाला. काँग्रेसनगर येथील धनवटे नॅशनल

‘लोकमत अँस्पायर एज्युकेशन फेअर-२0१४’चा थाटात समारोपनागपूर : ‘लोकमत’ समूहातर्फे आयोजित मोशन प्रस्तुत आणि व्हसिर्टी सहप्रायोजित ‘लोकमत अँस्पायर एज्युकेशन फेअर-२0१४’’चा रविवारी  समारोप झाला. काँग्रेसनगर येथील धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या प्रांगणात या तीन दिवसीय शैक्षणिक प्रदर्शनाला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळाला.  उपराजधानीतील हजारो विद्यार्थी व पालकांनी यात सहभागी होऊन करिअरच्या निरनिराळ्या वाटा जाणून घेतल्या. रविवारी शेवटच्या दिवशी  सकाळपासूनच अलोट गर्दी झाली. मार्गदर्शन व व्याख्यान सत्रांचा विद्यार्थ्यांंनी लाभ घेतला. ‘अँस्पायर’च्या रूपात सर्वार्थाने ‘करिअर गुरू’ मिळाला  असून, हे आयोजन नियमितपणे करावे, अशा भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केल्या. दहावी, बारावीनंतरच्या विविध कोर्सची माहिती गेल्या काही वर्षांंपासून ‘लोकमत’ एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून देत आहे. यावर्षीच्या  ‘अँस्पायर’मध्ये चाळीसच्यावर विविध शैक्षणिक संस्थांनी माहितीचा खजिना उपलब्ध करून दिला होता. या प्रदर्शानाला ६ जूनपासून सुरुवात झाली. तीन दिवसांत पाच हजाराच्यावर युवकांनी तर तीन हजार पालकांनी भेटी दिल्या. एरवी प्रत्येक शिक्षण  संस्थेत जाऊन माहिती घेण्याकरिता प्रयत्न करणार्‍या पालकांनीही या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली. या प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांंना विविध  तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. त्यांच्या समस्यांवर चर्चा करून त्यावरील उपाय सांगितले. प्रदर्शनाला भेट देणार्‍या प्रत्येकाच्या चेहर्‍यावर  शिक्षणाची योग्य संधी मिळाल्याचा आनंद दिसून येत होता. विशेष म्हणजे, अँस्पायरमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी दररोज ‘लकी ड्रॉ’द्वारे मोबाईल जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात  आली होती. याद्वारे तीन भाग्यवंतांना मोबाईल मिळाला. अँस्पायरच्या समारोपप्रसंगी सगळ्या स्टॉलधारकांना ‘लोकमत’ समूहाच्यावतीने स्मृतिचिन्ह  देऊन निरोप देण्यात आला. (प्रतिनिधी)शाळा परीक्षार्थी घडवीत आहे विद्यार्थी नाही- पाणिनी तेलंगशिकण्याची कला प्रत्येकाला जन्मजातच असते. बालपणी बाळाला भूक लागल्यावर तो रडतो, हे कोणी शिकवत नाही. तो बोलायला लागला की,  सर्वात जास्त प्रश्न विचारतो.  जेव्हा आईवडील त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊन थकतात, तेव्हा त्याला शाळेत घातले जाते. यातूनच शाळेची निर्मिती झाली  आहे. मात्र जसा जसा मुलगा पुढच्या वर्गात जातो, तसतसे त्याच्यात प्रश्न विचारण्याच्या क्षमता कमी होते. कारण आपली शिक्षण पद्धतीच त्याला प्रश्न  विचारू देत नाही. आज शाळेमध्ये विद्यार्थ्यांंना फक्त माहिती देण्यात येत आहे. त्यांना परीक्षेत पास होण्यापुरतेच शिकविले जात आहे. परीक्षेत काय  येईल, कशाचा अभ्यास करावा एवढय़ापुरत्याच शाळा राहिल्या आहे. त्यामुळे शाळा फक्त परीक्षार्थी घडवीत आहे.  जोपर्यंंत मुले विद्यार्थी बनणार नाही, तोपर्यंंत परीक्षार्थी बनू शकत नाही, असे पायोनियर स्टडी सेंटरचे पाणिनी तेलंग लोकमतच्या अँस्पायर एज्युकेशन  फेअरध्ये आयोजित ‘यशाची गुरुकिल्ली काय?’ या विषयावर आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. शाळा महाविद्यालयातील शिक्षकांच्या  शिकविण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थी झेरॉक्स मशिन झाले आहे. मनाला वाटते तेच क्षेत्र करिअरसाठी निवडा- बोन्द्रे प्रत्येकात अनंत क्षमता असतात. मात्र करिअरचे क्षेत्र निवडताना आपल्यातील क्षमता ओळखली पाहिजे. मित्रांच्या विचाराने, इतरांच्या प्रभावामुळे  तुम्ही करिअरची निवड करीत असाल, तर अपयशी ठराल. करिअर निवडताना आपल्या अंतरमनाला आवडेल, ते क्षेत्र निवडल्यास यश तुमच्यापुढे  लोटांगण घालेल, असा सल्ला स्नेहा ग्रुपचे संचालक डॉ. रजनीकांत बोन्द्रे यांनी विद्यार्थ्यांंना दिला.  लोकमतच्या अँस्पायर एज्युकेशन फेअरमध्ये  आयोजित ‘सक्सेस मंत्रा’ या विषयावर आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वप्रथम कुठलेही करिअर निवडताना त्याची संपूर्ण माहिती  मिळवून घ्या. एक ध्येय ठरवून घ्या, त्यासाठी मेहनत करा. आज मुलांना पालकांनी इतक्या सेवा उपलब्ध केल्या आहेत की विद्यार्थी रेडिमेड झाले  आहे.  गुगलमुळे तर मुलांची विचार करण्याची क्षमता हरवत आहे.  आज मुलांना उडायला भरपूर पंख आहेत, पण पंखात बळ राहिलेले नाही. कारण मुलांनी शॉर्टकटचा मार्ग अवलंबला आहे. मात्र शॉर्टकट हे  करिअरसाठी लाँगकट ठरू शकते हे मुलांनी ओळखावे.