शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

साहेबांची काळजी, शिपाई वाऱ्यावर

By admin | Updated: December 9, 2014 00:53 IST

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झालेल्या पोलिसांना व्यवस्था पुरविताना दुजाभाव केला जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हिवाळी अधिवेशन : पीआयना शुद्ध पाणी, शिपायांचे टाकीला तोंड राजेश निस्ताने - यवतमाळविधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झालेल्या पोलिसांना व्यवस्था पुरविताना दुजाभाव केला जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याच वेळी शिपाई-जमादारांना थेट टाकीच्या नळान्ला तोंड लावून पाणी प्यावे लागत आहे. खाकी वर्दीतील पोलीस हा माणूसच. मात्र सरकार त्या माणसांमध्येही दुजाभाव करताना दिसते. पोलिसांना हुद्यानुसार वेतन, भत्ते, सोईसुविधा मिळतात. परंतु सार्वजनिक ठिकाणीसुद्धा ही सापत्न वागणूक कायम असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. नागपुरात अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातून सुमारे १० हजार कर्मचारी बंदोबस्तासाठी आले आहेत. त्यात पोलीस अधिकाऱ्यांची संख्या कमी आणि कर्मचाऱ्यांची अधिक आहे. म्हणून त्याच पद्धतीने त्यांच्यासाठी निवास, खानपानाची व्यवस्था केली गेली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी टाकी उपलब्ध करून दिली. तेथे ग्लासचीही व्यवस्था नाही.थेट टाकीच्या नळाला तोंड लावून पाणी प्यावे लागत आहे तर दुसरीकडे अधिकाऱ्यांसाठी खास शुद्ध पाण्याच्या कॅन बोलविण्यात आल्या आहेत. बरेच आजार दूषित पाण्यामुळे होतात. बंदोबस्ताला आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे आरोग्य बिघडू नये म्हणून त्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले. ते पाहता थेट नळाचे पाणी पिणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. साहेब आणि शिपायामध्ये फरक दाखविणारी अशीच व्यवस्था अन्य बाबतीतही पहायला मिळते. अशाच व्यवस्थेने अखेर थंडीत एका पोलीस जमादाराचा बळी गेला. पोलीस दलातील हा भेदभाव नेहमीच अधोरेखीत होतो. पोलीस कर्मचाऱ्यांना साध्या दोन खोल्यांच्या क्वॉर्टरसाठी वर्षोगणती प्रतीक्षा यादीत राहावे लागते. तर दुसरीकडे आयपीएस अधिकाऱ्याला किमान एकरभर जागेतील भलामोठा बंगला, खाकी वर्दीतील नोकर-चाकर, स्वत:सह परिवारासाठी दोन ते तीन वाहने उपलब्ध करून दिली जातात. हा असमतोल सरकारी कृपेनेच कायम ठेवला जात आहे. त्यामुळे आम्ही माणसे नाहीत काय, आम्हाला आरोग्य नाही काय, असा जाब पोलीस शिपायांमधून विचारला जात आहे.