शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दरडोई उत्पन्न वाढले, पण आदिवासी अजूनही उपेक्षितच; सुधीर मुनगंटीवार यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 02:17 IST

राज्यातील ३२ लाख निराधारांसाठी वर्षाला ५ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

- अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न वाढले, जीएसडीपीमध्ये आपण इतर राज्यांच्या पुढे गेलो, मात्र दुसरीकडे भामरागडचे आदिवासी आजही कौलाच्या घरात आणि पत्र्याच्या झोपडीत रहातात, अशी खंत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. राज्यातील ३२ लाख निराधारांसाठी वर्षाला ५ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आजही कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २१,००० हजार रुपये असल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी निराधार हे तहसील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत असतात, म्हणून मी या लोकांचे मानधन ६०० वरुन १२०० रुपये केले आहे. दिव्यांगांना घर देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. सातव्या वेतन आयोगामुळे राज्याच्या तिजोरीवर २४ हजार कोटींचा बोजा पडला, म्हणून २० हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर करावा लागला, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.अर्थसंकल्पातील घोषणांसाठी पैसा कोठून येणार?२७ फेब्रुवारी रोजी जेव्हा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता, त्याचवेळी या घोषणांची तयारी केली होती. मात्र आचारसंहितेमुळे त्यावेळी जाहीर केले नाही. राज्याचे उत्पन्न आज सव्वातीन लाख कोटी रुपयांवर गेले आहे. त्यामुळे निधीची कमतरता नाही.निवडणूक डोळ्यापुढे ठेवून धनगर समाजासाठी १ हजार कोटीची तरतूद केलीे. याआधी हे का करावे वाटले नाही का? सरकार निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आम्ही निवडणुकांना आमच्या कामाचे बाय प्रॉडक्ट मानतो. आम्ही एलबीटी माफ केला, टोल माफ केला, मराठा आरक्षण दिले, हे सगळे निर्णय काही फक्त निवडणुकांसाठी नव्हते. 

राज्यावर सव्वा चार लाख कोटींचे कर्ज आहे. ऋण काढून सण करण्याचा हा प्रकार नाही का?नाही. कारण कोणतेही कर्ज मोजण्याची पध्दत असते. माणसाच्या शरीरातील रक्त आपण हिमोग्लोबिन किती आहे असे मोजतो, ते लिटरमध्ये मोजत नाही. तसेच राज्यावरील ऋणभार मोजण्याची पध्दत आहे. २००४ साली हा ऋणभार २८ टक्के होता, तो आता १५ टक्के झाला आहे आणि तो मर्यादेच्या आत आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार