शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

उमेदवार मतदारांना करताहेत ‘ट्रॅक’

By admin | Updated: January 19, 2017 03:13 IST

निवडणुकीला अवघा महिना शिल्लक असल्याने प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची संभाव्य उमेदवारांची लगीनघाई सुरु झाली

मुंबई : निवडणुकीला अवघा महिना शिल्लक असल्याने प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची संभाव्य उमेदवारांची लगीनघाई सुरु झाली आहे. मतदारांची माहिती झटपट मिळावी आणि त्यांना ट्रॅक करता यावे यासाठी बहुतांशी उमेदवारांनी मोबाईल अ‍ॅपला पसंती दिली आहे. एका क्लिकवर माहिती मिळविण्यास मदत करणाऱ्या अशा प्रकारच्या अ‍ॅपची मागणी उमेदवारांकडून दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती अ‍ॅपनिर्माते देत आहेत.फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी सगळीकडेच जोरदार तयारी सुरु आहे. संभाव्य उमेदवारांचे उमेदवारी मिळण्यासाठीचे प्रयत्न सुरु असून इच्छुकांनी त्यांच्या प्रभागातील मतदारांना ट्रॅक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशेष सॉफ्टवेअर प्रणालीला मोबाईल अ‍ॅपचे रुप दिले आहे. या माध्यमातून प्रभागातील मतदारांची नावे एकत्रित करण्यात येत आहेत. त्यामुळे त्या प्रभागातील मतदारांची लोकसंख्या समजण्यास मदत होत असल्याचे इच्छुक उमेदवारांचे म्हणणे आहे.मोबाईलमध्ये असलेल्या या अ‍ॅपच्या माध्यमातून महिला आणि पुरुषांची लोकसंख्या, धर्मनिहाय लोकसंख्येची नोंद करण्यात येत आहे. शिवाय मतदारांची विभागणी ‘फिक्स व्होटर’, ‘नोन व्होटर’, ‘डाऊटफुल व्होटर’, ‘अपोझिट व्होटर’, ‘अननोन व्होटर’ करण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी किती मतदान झाले? हे त्या त्या पक्षाच्या गटप्रमुखांना मोबाईल अ‍ॅपमध्ये केलेल्या नोंदीमधून एकत्रित करणे सहज शक्य होणार आहे. कागदांवरील नोंदीमध्ये गुरफटून जाण्यापेक्षा मोबाईल फ्रेंडली सॉफ्टवेअरमधून नोंदी करणे शक्य असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच की काय अशा प्रकारच्या मोबाईल अ‍ॅपची मागणी वाढली असल्याचे सॉफ्टवेअर निर्माते ओमकार ताम्हणकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)