शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला

By admin | Updated: February 22, 2017 18:30 IST

महापालिका निवडणूक : सोशल मीडियावरच्या निकालामुळे धास्ती

पंचवटी : महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल मंगळवारी मतदानप्रक्रिया पार पडली. गुरुवारी (दि.२१) मतमोजणी प्रक्रिया होणार असल्याने पंचवटी विभागातील सर्वच उमेदवारांसह त्यांच्या शेकडो समर्थकांचा जीव टांगणीला लागला आहे. बुधवारच्या दिवशी ज्या त्या उमेदवारांच्या समर्थकांनी परिसरातील नागरिकांच्या भेटी घेत तुम्हाला काय वाटते, कोणाची वर्णी लागेल, कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून येतील याबाबत माहिती घेत मतदानाची गोळाबेरीज सुरू करण्याचे काम केले.सोशल मीडियावर मतमोजणी होण्यापूर्वीच निकालाच्या एक्झिट पोलच्या पोस्ट व्हायरल झाल्याने अनेकांच्या छातीत धडकीच भरली आहे. सोशल मीडियावर झळकणाऱ्या निकालाच्या पोस्टमुळे कार्यकर्त्यांच्या तोंडचे पाणी पळाले तर स्वत: उमेदवारही काहीसे धास्तावले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या एक्झिट पोलप्रमाणेच निकाल लागणार तर नाही ना, अशीच धास्ती सध्या ज्या त्या प्रभागातील उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याने काहींनी नाराजी व्यक्त करून उद्याच काय ते समजेल, अशा पोस्ट टाकून शांतपणे बसण्यात धन्यता मानली आहे. सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या निकालात दिग्गज उमेदवारांसह काही नगरसेवकांचेही पत्ते कापले असल्याने आपण निवडून येणारच असे म्हणणाऱ्यांच्या उरात चांगलीच धडकी भरली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या निकालात सर्व पक्षाचे पॅनल टू पॅनल निवडून येणार नाही त्यातच काही पक्षांचे ठराविक प्रभागात एकही उमेदवार निवडून येणार नाही, अशा याद्याच प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांसह त्यांचे समर्थक व मतदारांचे बुधवारी सकाळी होणाऱ्या निकाल प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)