शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये उमेदवाराला आले ३४ हॉलतिकीट, आरोग्य विभागाचा पुुन्हा सावळागोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 06:03 IST

health department : पृथ्वीराज अरुण गोरे (रा. शहाबाजपूर, ता.जि. बीड) या विद्यार्थ्याने २० ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. यात त्याने औरंगाबाद विभागाची निवड केली होती. मात्र, त्याला एक-दोन नव्हे तर तब्बल ३४ हॉलतिकीट मिळाले आहेत.

- सोमनाथ खताळ 

बीड : आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा होत आहेत. याच परीक्षेसाठी बीडमधील एका उमेदवाराला एक-दोन नव्हे तर तब्बल ३४ हॉलतिकीट आले आहेत. प्रत्येकावर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आहे. आता या विद्यार्थ्याने परीक्षा द्यायची कुठे? असा प्रश्न आहे. यानिमित्ताने आरोग्य विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 

पृथ्वीराज अरुण गोरे (रा. शहाबाजपूर, ता.जि. बीड) या विद्यार्थ्याने २० ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. यात त्याने औरंगाबाद विभागाची निवड केली होती. मात्र, त्याला एक-दोन नव्हे तर तब्बल ३४ हॉलतिकीट मिळाले आहेत. हे पाहून पृथ्वीराजही अवाक् झाला. त्याने हॉलतिकीटवरील क्रमांकावर संपर्क साधला. यावर त्याला एकाने औरंगाबाद, तर दुसऱ्याने राज्यात कुठेही परीक्षा देण्याचा सल्ला दिला. 

एकदा परीक्षा झाली रद्द,  आणि आता पुन्हा...आरोग्य विभागाने एका खासगी संस्थेमार्फत ही पदभरती सुरू केली आहे. या अगोदर मोठा गोंधळ झाल्याने विद्यार्थी केंद्रावर पोहोचल्यानंतरही अचानक परीक्षा रद्द केल्या होत्या. त्यानंतर २४ ऑक्टोबरला गट क पदासाठी परीक्षा झाली. आता ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेतही एकाच विद्यार्थ्याला तब्बल ३४ हॉलतिकीट देऊन गोंधळाचा कळस गाठला आहे.  

आरोग्य विभागाकडून प्रतिसाद नाहीया प्रकरणाबाबत आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील, डॉ. साधना तायडे आणि आयुक्त एन. रामास्वामी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला. डॉ. पाटील यांनी संदेश करण्याचा सल्ला दिला, तर डॉ. तायडे व रामास्वामी यांनी फोनला प्रतिसादच दिला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही. 

टॅग्स :examपरीक्षाBeedबीड