अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांचे जात प्रमाणपत्र रद्द करून ते शासनजमा करण्याचे आदेश अकोल्याच्या विभागीय पडताळणी समितीने दिले. त्याना दिलेले लाभ जिल्हाधिकाऱ्यांनी काढून घ्यावेत, असे आदेशही समितीने दिले. रायमुलकर यांची जात सुतार असताना, त्यांनी बलाई जातीचे प्रमाणपत्र सादर केले. त्याबाबत अॅड. साहेबराव अश्रूजी सरदार आणि ९ जणांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे २००९मध्ये अपील दाखल केले होते. समितीने ३१ डिसेंबर २०१५ रोजी दिलेल्या निर्णयानुसार रायमुलकर यांचा बलाई जातीचा दावा अमान्य करण्यात आला होता. बुलडाणा उपविभागीय अधिकाऱ्यांनी २००६मध्ये रायमुलकर यांना दिलेले बलाई जातीचे प्रमाणपत्र रद्द ठरविण्यात आले असून, ते शासनजमा करण्याचा निर्णय विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मंगळवारी दिला.- साहेबराव जाधव, उपायुक्त, विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीजात पडताळणी समितीने दिलेला निर्णय चुकीचा आहे. समितीच्या दोन सदस्यांनी वेगवेगळे मत नोंदविले आहे. त्यापैकी एकाचे माझ्या बाजूने आहे. माझे जात प्रमाणपत्र २०१४ साली न्यायालयानेच वैध ठरविले होते. माझा भाऊ, पुतणीचे प्रमाणपत्र वैध असताना माझे अवैध कसे? याविरोधात न्यायालयात जाणार आहे. - संजय रायमुलकर, आमदार, मेहकर
आमदाराचे जात प्रमाणपत्र रद्द!
By admin | Updated: January 20, 2016 02:48 IST