शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानासाठी निकालाची अट रद्द; २८ हजार शिक्षकांना होणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 03:52 IST

उच्च माध्यमिक शाळांना शासकीय अनुदानासाठी फडणवीस सरकारने लागू केलेली बारावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची अट सरकारने रद्द केली आहे.

- अतुल कुलकर्णी मुंबई : उच्च माध्यमिक शाळांना शासकीय अनुदानासाठी फडणवीस सरकारने लागू केलेली बारावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची अट सरकारने रद्द केली आहे. त्यामुळे या शाळांना शंभर टक्के अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.२००९ मधील आघाडी सरकारने कायम विनाअनुदान शाळांच्या नावापुढील ‘कायम’ शब्द काढून अनुदान देण्यासाठी काही अटी व निकष निश्चित केले होते. शाळांना इमारत, क्रीडांगण, पिण्याच्या पाण्याची सोय, फर्निचर यांची पूर्तता करणाऱ्या शाळांना पहिल्या वर्षी २० टक्के, दुसºया वर्षी ४० टक्के, तिसºया वर्षी ६० टक्के, चौथ्या वर्षी ८० टक्के तर पाचव्या वर्षी १०० टक्के अनुदान देण्याचे धोरण ठरविले. परंतु, फडणवीस सरकारने दहावी शाळांना बारावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची अट लागू केली. या अटीमुळे अनेक शाळा अनुदानापासून वंचित राहिल्या. त्यामुळे ही अट रद्द करावी यासाठी विक्रम काळे, डॉ. सुधीर तांबे, दत्तात्रय सावंत व बाळाराम पाटील या शिक्षक आमदारांनी गेल्या अधिवेशनात आंदोलन केले होते.१०६ कोटींची तरतूदअनुदानासाठीची अट रद्द झाल्यामुळे आता २४१७ शाळा व ४५६१ तुकड्यांवरील २८,२१७ शिक्षक, शिक्षकेतर पदांना १ एप्रिल २०१९ पासून वाढीव २०% अनुदान मंजूर झाले आहे. या अनुदानासाठी १०६ कोटी ७४ लाखाची तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केली आहे.