शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे, हेच ध्येय - हबीब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 06:05 IST

किसानपुत्राच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन

सचिन लुंगसे ।लोकमत न्यूज नेटवर्कशेकडो कायदे हे शेतकरीविरोधी आहेत. कमाल शेतजमीन धारणा कायदा (सीलिंग), आवश्यक वस्तू कायदा १९५५ कायदा आणि जमीन अधिग्रहण कायदा अशा तीन कायद्यांनी तर शेतकरी वर्गाला लुटले आहे. आमची भूमिका एकच आहे; ती म्हणजे आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. हे आंदोलन आहे ते किसानपुत्राच्या न्याय्य हक्कांसाठी, असे मत किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख अमर हबीब यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

प्रश्न : किसानपुत्र आंदोलन ही संघटना आहे का, नेमके काय आहे?उत्तर : नाही. किसानपुत्र आंदोलन ही संघटना नाही. आमच्यात कोणीच अध्यक्ष, सचिव किंवा कोषाध्यक्ष नाही. किसानपुत्र आंदोलन हे शेतकरीविरोधी कायदे संपवण्यासाठी आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. कोणतीही व्यक्ती आंदोलनात सहभागी होऊ शकते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे आंदोलनासाठी निधी गोळा करण्याऐवजी गरजेवेळी किसानपुत्रांनी पदरमोड करून आंदोलनाच्या गरजेएवढाच खर्च करायचा; अशी आम्ही आमच्या कामाची पद्धत ठेवली आहे.प्रश्न : किसानपुत्र आंदोलन करायचे म्हणजे नेमके काय करायचे?उत्तर : उपोषण, मोर्चा, धरणे, रास्ता रोको, बंद, गर्दी गोळा करणे या गोष्टी तेवढ्या परिणामकारक राहिल्या नाहीत. परिणामी, आपणास नवे मार्ग शोधावे लागतील. लोकांची फसवणूक करून ज्यांना नेते व्हायचे आहे ते गर्दी जमवतात. आमचे काम परिवर्तनापुरते मर्यादित नाही, तर व्यवस्था हीच परिवर्तनाचे मूळ असल्याने येथे संख्येच्या तुलनेत शक्कल महत्त्वाची आहे. परिणामी, आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालेल.प्रश्न : केवळ न्यायालयीन लढाई लढता का?उत्तर : नाही. आम्ही केवळ न्यायालयीन लढाई लढत नाही तर, आमच्या पाच आघाड्या आहेत. या पाच आघाड्यांमध्ये न्यायालयीन आघाडी, संसदीय आघाडी, जनआंदोलन आघाडी, प्रचार आणि प्रसार आघाडी, राष्ट्रीय आघाडी व अन्नदात्यासाठी अन्नत्यागी उपवास केला जातो. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे; त्या शेतकऱ्यांसाठी सहवेदना व्यक्त केली जाते.आंदोलनाने काय केले?उत्तर : सुरुवातीपासून विचार करायचा झाल्यास २०१५ सालापासून आम्ही कामास लागलो. महत्त्वाचे म्हणजे शेतकरी वर्गाच्या विरोधात कायदे असतात हेच लोक ऐकण्यास किंवा मान्य करण्यास तयार नव्हते. परिणामी, हा विषय घेत राज्यभर फिरलो. कायदेविषयक परिषदा घेतल्या. पुस्तिका काढल्या. सोशल मीडियावर प्रचार आणि प्रसार केला. याचे फलित म्हणजे मोठ्या संख्येने किसानपुत्र आंदोलनाशी जोडले गेले. त्यांनी त्यांच्या परीने आंदोलनास योगदान दिले.निवडणुकीत काय भूमिका आहे?उत्तर : आम्ही कुठल्याच राजकीय पक्षाशी संबंधित नाही. जे उमेदवार शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, अशी भूमिका जाहीरपणे घेतील, अशा उमेदवारांना किसानपुत्र आंदोलनाचा नेहमीच पाठिंबा राहील. 

जो कोणी शेतकरीविरोधी कायदे रद्द करायला काम करेल तो या आंदोलनात आहे असे आम्ही मानतो. - अमर हबीब