शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाची एकही कुणबी नोंद रद्द कराल तर महागात पडेल; मनोज जरांगे यांचा सरकाला इशारा

By बापू सोळुंके | Updated: June 21, 2024 22:11 IST

मराठा समाज मोठा तर ओबीसी बांधव लहान भाऊ असल्याचे जरांगे म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाच्या ५६ लाख कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी ओबीसी नेते करीत आहेत. येवल्यावाल्यांचे (मंत्री छगन भुजबळ) ऐकून जर एकही कुणबी नोंद रद्द केली तर महागात पडेल, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी रात्री येथे राज्यसरकारला दिला.

शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले जरांगे यांनी शुक्रवारी रात्री पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या ५६ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. यामुळे कायदेशीररित्या नोंदी सापडलेले मराठा बांधव ओबीसीच आहेत. आता हैदराबाद स्टेट, सातारा स्टेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेट मध्ये असलेल्या नोंदी ग्राह्य धरून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे लागेल. आणि हे आरक्षण आपण घेतल्याशिवाय राहणार नसल्याचे जरांगे म्हणाले.

जरांगे यांचे आंदोलन सरकार चालवत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आपल्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आपल्यासाठी सारखेच आहे. केवळ कोट्यवधी मराठा समाज आज माझ्या पाठिशी उभा आहे, म्हणूनच आपला लढा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी नेते केवळ मराठा आंदोलनाची बरोबरी करण्यासाठी वडीगोद्री येथे आंदोलन सुरू केल्याचा आरोप करीत जरांगे यांनी केला. आंदोलन कसे कणखर पाहिजे. मात्र आमच्या आंदोलनस्थळी चार मंत्री आले होते तर त्यांच्याकडेही चार मंत्रीच आले पाहिजे असा आग्रह ते धरत आहेत. आम्ही जेथे आंदोलन केले तेथेच ते आंदाेलन करून काय दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. मराठा समाज मोठा तर ओबीसी बांधव लहान भाऊ असल्याचे जरांगे म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण