ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि.१२ - मराठवाड्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करणे शक्यच नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर मांडली.
मराठवाड्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याच्या मागणीसाठी इंडियन ख्रिश्चन युनायटेड ब्रिगेडचे जालना जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे, न्यायमूर्ती के. एल. वडणे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत अॅड. संजीव देशपांडे यांनी केंद्राची बाजू मांडली. पासपोर्टसाठी दाखल होणाºया अर्जांची संख्या लक्षात घेता मराठवाड्यात स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू करणे शक्य नसल्याचे अॅड. देशपांडे यांनी खंडपीठात सांगितले. यावर शपथपत्र दाखल करण्यासाठी केंद्र सरकारने वेळ मागितल्याने पुढील सुनावणी येत्या १९ जुलै रोजी होणार आहे.