शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

‘शाळांत लैंगिक शोषणाबाबत मोहीम राबवा’ , उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 03:37 IST

लैंगिक शोषणासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहीम राबवा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी केली.

मुंबई : लैंगिक शोषणासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहीम राबवा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी केली.इयत्ता पाचवीपासूनच विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक शोषणासंदर्भात जागृती निर्माण करा. दृढ नाते, लैंगिक शोषणासंदर्भात त्यांना माहिती द्या. या मोहिमेत पुरुषांनाही सहभागी करून घ्या. घरगुती हिंसाचारांच्या केसमध्ये बहुतांशी पुरुष आरोपी असतात. त्यामुळे या मोहिमेत मुले, वडील, पती यांनाही सहभागी करून घ्या. त्यामुळे महिलांशी कसे वागायचे, ते त्यांनाही समजेल, असे न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी म्हटले.शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण होऊ नये, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती राज्य महिला आयोगाने न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयानेही शाळांमध्ये ही मोहीम राबवणे आवश्यक असल्याचे म्हटले.‘दृढ नात्या’चा अर्थ विद्यार्थ्यांना कळला पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले. राज्य महिला आयोगातील रिक्त पदे भरण्यात यावीत, आयोगाच्या शाखा राज्यातील लहान व दुर्गम भागातील जिल्ह्यांमध्ये सुरू कराव्यात यासाठी पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट