दिग्दर्शकांना दिशा देणारे कॅमेरामन मूर्ती

By Admin | Published: November 27, 2014 11:33 PM2014-11-27T23:33:53+5:302014-11-28T00:08:20+5:30

गोविंद निहलानी : मी त्यांच्याकडून खूप शिकलो...

Cameraman idol directed towards directors | दिग्दर्शकांना दिशा देणारे कॅमेरामन मूर्ती

दिग्दर्शकांना दिशा देणारे कॅमेरामन मूर्ती

googlenewsNext

संदीप आडनाईक - पणजी --व्ही. के. मूर्ती हे दिग्दर्शकांना दिशा देणारे कॅमेरामन होते. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे, असे ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक गोविंद निहलानी म्हणाले.
गोव्यात सुरू असलेल्या ४५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात व्ही. के. मूर्ती यांना आदरांजली म्हणून त्यांचे छायाचित्रण असलेला गुरुदत्त यांचा ‘कागज के फूर’ हा चित्रपट दाखविण्यात आला. ज्येष्ठ निर्माते गोविंद निहलानी यांनी ‘इफ्फी’त मूर्ती यांच्या आठवणी ताज्या केल्या.
प्रमोद चक्रवर्ती, गुरुदत्त, श्याम बेनेगल, गिरीष कर्नांड, विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे यांच्यासारख्या दिग्गजांचे मूर्ती हे लाडके कॅमेरामन होते. दिग्दर्शक किती मूर्ती यांच्यावर विश्वास टाकतात, हे मी स्वत: अनुभवले आहे. ते दिग्दर्शकांना सूचना करत नसत; पण सूचित निश्चित करत होते. यासंदर्भातील काही आठवणी निहलानी यांनी सांगितल्या. मला मूर्ती यांच्यासोबत काम करायला मिळाले ही माझ्यासाठी एक मोठी संधी होती. त्यांनी केलेले काम पडद्यावर पाहणे, हे माझ्यासाठी खूप अभिमानाचे होते.
देव आनंद आणि गीता बाली यांच्या एका चित्रपटादरम्यान गुरुदत्त यांच्याशी मूर्ती यांची पहिली भेट झाल्याचे निहलानी म्हणाले. मूर्ती यांचे कॅमेरा कामासंदर्भात स्वत:चे असे खास सिद्धांत असायचे. ते कृष्णधवलचे रंगीत चित्रपट झाले, तरी बदलले नाहीत. कॅमेऱ्यासमोर आल्यानंतर ते दृश्यांची खोली किती चांगली मिळेल त्यावर विचार करून कॅमेरा लावत. रजिया सुलतान हा त्यादृष्टीने चांगले उदाहरण म्हणता येईल. कृष्णधवल चित्रपटातून त्यांनी अनेक कमाल दाखविली आहे. त्यात गुरुदत्त यांच्या ‘चौदहवी का चांद’ या चित्रपटातील शीर्षक गीताचे दृश्य चित्रण आणि ‘प्यासा’ चित्रपटातील जाने क्या तूने कही या गाण्यांचे चित्रण पाहता येईल. या दृश्यातून दिग्दर्शक गुरुदत्त यांच्यावर कॅमेरामन मूर्ती यांनी मात केल्याचे दिसून येईल. प्यासाच्या वेळेस वहिदा रेहमान या लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री होत्या; पण त्यांची भूमिका तशी नव्हती. त्यामुळे गाण्याच्या दृश्यात ते ग्लॅमरस दिसत नाहीत.


लोकसंगीताचा समृद्ध इतिहास ‘इफ्फी’त
पणजी : बंगालच्या कानाकोपऱ्यात फकिरांकडून गायल्या जाणाऱ्या लोकसंगीताची परंपरा लुप्त होताना दिसत आहे. ती परंपरा जतन करून ठेवण्याची आज गरज आहे. नेमके हेच सांगण्याचा प्रयत्न ‘साँग्ज आॅफ बॉर्डर्स आॅफ बंगाल’ या माहितीपटातून निर्मात्या दिग्दर्शिका मोनालिसा दासगुप्ता यांनी केला आहे. या अतिशय सुंदर माहितीपटाला चित्रपट अभ्यासकांची प्रशंसा लाभली.

Web Title: Cameraman idol directed towards directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.