शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

ठाण्यातील धाडसत्रामुळे अहमदाबादचे कॉल सेंटर झाले बंद!

By admin | Updated: October 9, 2016 21:11 IST

७० जणांना अटक केल्याचे वृत्त देशभर पसरताच अहमदाबाद येथील प्रल्हादनगरमधील पिनॅकल बिझनेस सेंटर हे कॉल सेंटरही तडकाफडकी बंद करण्यात आले

जितेंद्र कालेकर/ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 9 - जिल्हयातील मीरा रोड येथील सात कॉल सेंटरवर गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकून ७० जणांना अटक केल्याचे वृत्त देशभर पसरताच अहमदाबाद येथील प्रल्हादनगरमधील पिनॅकल बिझनेस सेंटर हे कॉल सेंटरही तडकाफडकी बंद करण्यात आले आहे. हे कॉल सेंटर बंद झाल्यामुळे येथील ४०० ते ५०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या कर्मचाऱ्यांनी कोणा कोणाला फसविले, याचाही तपास आता ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी गुजरात पोलिसांच्या मदतीने करीत आहेत.अहमदाबाद शहरातील प्रल्हादनगरमधील या पिनॅकल बिझनेस सेंटरमध्ये चार कॉल सेंटर अशाच प्रकारे सुरू होती. तिथूनही अमेरिकेत धमक्या देणारे, फसवणुकीचे तसेच खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू होते. याबाबतची खातरजमा झाल्यानंतर ८ आॅक्टोबर रोजी पोलीस उपायुक्त पराग मणेरे, युनिट एकचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, खंडणी विरोधी पथकाचे निरीक्षक एन. टी. कदम, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे निरीक्षक रवींद्र दौंडकर, उपनिरीक्षक विजय उपाळे आदींच्या पथकाने त्या ठिकाणी शनिवारी धाडसत्र राबविले. मात्र, चार पैकी एकाही कॉल सेंटरवर कर्मचारी सोडा कोणतीही साधनसामुग्री उपलब्ध पोलिसांना मिळाली नाही. ५ आॅक्टोबरला ठाण्यात धाड टाकल्याचे समजल्यानंतर ६ आॅक्टोबरला एकाच दिवसात कॉल सेंटर रिक्त करण्यात आले. त्याचदिवशी कॉल सेंटरच्या भाड्यापोटीची रक्कमही संबंधितांना अदा करण्यात आली. अहमदाबाद पाठोपाठ दिल्ली, चंदीगड, कलकत्ता या शहरांमध्येही अशाच प्रकारे फसवणूक करणारे कॉल सेंटर सुरू होते. त्यांनीही तिथून पळ काढला आहे. अर्थात, देशभरात कोणत्याही ठिकाणी त्याबाबतची माहिती मिळाल्यास तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली...........................मीरा रोड मध्ये पुन्हा कारवाई*मीरा रोड मध्ये ठाणे पोलिसांनी ८ आॅक्टोबर रोजी पुन्हा दुसरे धाडसत्र राबविले. या कारवाईत काशीगाव रोड नाक्याजवळ रामदेव प्लाझा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मोहसिन फतवारी या कॉल सेंटर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. याठिकाणी ८५ पैकी ६१ संगणकांचे हार्डडिस्क आणि काही कागदपत्रे ताब्यात घेऊन कॉल सेंटरला सिल करण्यात आले. * मीरा रोड येथील रसाज सर्कल, शांती प्लाझा येथील मेसर्स पेअर ग्लो सर्व्हिसेस प्रा. लि. या कॉल सेंटरवरही कारवाई झाली. याठिकाणी २१ पैकी १८ संगणकांचे हार्डडिस्क कारवाईपूर्वीच काढलेले आढळले. अमेरिकन नागरिकांची फसवणुकीसाठी कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्याकडून उपयोगात आणण्याचा सूचना फलक, त्यावर त्याचे नाव, त्यांना दिलेले टार्गेट, कॉलच्या दरम्यान वापरण्याचे टोपण नाव आणि दिनांकांचा उल्लेख असलेला फलकही जप्त केला आहे.......................* मीरा रोड पूर्व येथील स्पेस रिअ‍ॅलिटी ९१२ इमारतीमधील राकेश शकला याचा डिवाईन सोल्युशन्स या कॉलसेंटरवरही धाड टाकण्यात आली. त्याठिकाणच्या सर्वच म्हणजे ३९ संगणकांचे हार्डडिस्क आधीच काढलेले आढळले. *तर सदाशिव इमारतीच्या बाजूला असलेल्या इमारत क्र. ६ मध्ये दिनेश वैश्य याचे कॉल सेंटर बंद केल्याचे आढळले. त्याठिकाणी १६ संगणकांचे हार्डडिस्क, सर्व्हर आणि कागदपत्रे सहायक पोलीस आयुक्त मुकूंद हातोटे यांच्या पथकाने जप्त केली. ----------------२०० जणांच्या पथकाची नॉनस्टॉप कारवाई५ आॅक्टोबर रोजी मीरा रोड भागात ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या २०० जणांच्या पथकाने कॉल सेंटरवर कारवाई केली होती. त्यानंतर सलग पाचव्या दिवशीही वेगवेगळया ठिकाणी या पथकांकडून अविरत कारवाई सुरू आहे.