शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या कारभारावर कॅगचे ताशेरे

By अतुल कुलकर्णी | Updated: July 21, 2018 03:33 IST

कोराडी, चंद्रपूर, खापरखेडा, भुसावळ आणि परळी या पाच वीज निर्मिती प्रकल्पांची नियोजित किंमत २५,०४८ कोटी अपेक्षित असताना या प्रकल्पांचे काम सुरू झाले

नागपूर : कोराडी, चंद्रपूर, खापरखेडा, भुसावळ आणि परळी या पाच वीज निर्मिती प्रकल्पांची नियोजित किंमत २५,०४८ कोटी अपेक्षित असताना या प्रकल्पांचे काम सुरू झाले तेव्हा त्याची किंमत ९९६४ कोटींनी वाढून ती ३५,०१२ कोटींवर गेल्याची माहिती भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी आपल्या अहवालात मांडली आहे. वीज निर्मिती कंपनीच्या अनेक चुकीच्या गोष्टी कॅगने आपल्या अहवालातून उजेडात आणल्या आहेत. त्यामुळे वीज कंपन्यांचा कारभार किती आणि कसा बेजबाबदारपणे केला जात आहे हे समोर आले आहे. कॅग आपल्या अहवालात पुढे म्हणते की, परळी येथे अतिरिक्त एककाचे बांधकाम पाण्याची कायमस्वरूपी सोय नसतानाही केले गेले जे समर्थनीय नव्हते. भुसावळ येथील प्रकल्प अहवालच सदोष होता, त्यात रेल्वे साईडिंग बांधण्याची तरतूदच केली नाही त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीस विलंब झाल्याचेही समोर आणले आहे. कोराडी प्रकल्पात फ्ल्यू गॅस डिसल्फरायझेशन आणि ओझोनायझेशन संयंत्रे बसवली गेली नाहीत. कोणत्याही नव्या प्रकल्पाने १०० टक्के फ्लाय अ‍ॅश वापराचे उद्दिष्ट साध्य केले गेले नाही.राज्यातील अतिरिक्त वीज विचारात घेता विजेच्या वितरणाचे नियोजन केले गेले नाही परिणामी हजारो मेगावॅट विजेचे नुकसान झाल्याचे कॅगने समोर आणले आहे. ज्या एककांची किंमत कमी होती ती आधी पाठवायची होती व ज्या प्रकरणात विजेची आवश्यकता नाही आणि ज्यांची विद्युत निर्मिती किंमत जास्त आहे त्या एककांची विद्युत निर्मिती कमी करायची होती. पण ते केले गेले नाही. परिणामी, २०१२-१३ मध्ये निर्मितीचे नुकसान १४३ दशलक्ष युनिट होते ते २०१६-१७ मध्ये १७,३१३ दशलक्ष युनिटने नुकसान वाढले. त्यामुळे कंपनीच्या महसुलांचे नुकसान झाल्याचेही समोर आले आहे.

टॅग्स :electricityवीजNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८