शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा ‘अभासे’सोबत काडीमोड!

By admin | Updated: October 26, 2016 05:00 IST

दक्षिण मुंबईतील चर्चेचा वॉर्ड म्हणून ओळख असलेल्या ‘ई’ वॉर्डमध्ये यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत अधिक चुरस पाहायला मिळणार आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत

- चेतन ननावरे, मुंबई

दक्षिण मुंबईतील चर्चेचा वॉर्ड म्हणून ओळख असलेल्या ‘ई’ वॉर्डमध्ये यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत अधिक चुरस पाहायला मिळणार आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत या ठिकाणी काँग्रेस, शिवसेना, अखिल भारतीय सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्वच पक्षांचे वर्चस्व दिसले होते. मात्र यंदा भारतीय जनता पक्षासोबत काडीमोड घेण्याच्या विचारात असलेली शिवसेना अखिल भारतीय सेनेसोबतची युतीही तोडण्याचा विचार करत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. तसे झाल्यास अभासेसमोरील समस्या वाढणार असून राजकीय समीकरणे बदलणार आहेत.प्रभागरचनेत झालेल्या बदलाचा मोठा फटका ‘ई’ वॉर्डला बसला आहे. गेल्या वेळी वॉर्डमध्ये आठ नगरसेवक पदांसाठी निवडणुका रंगल्या होत्या. मात्र यंदा वॉर्डमधील एक प्रभाग दुसऱ्या वॉर्डमध्ये सरकला आहे. त्यामुळे केवळ सात प्रभागांसाठी निवडणुका रंगणार आहेत. २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीनुसार ई वॉर्डमध्ये काँग्रेसचे तीन, शिवसेनेचे दोन, अभासेचे दोन आणि मनसेचा एक नगरसेवक होता. तर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. याउलट काँग्रेस आणि सेनेच्या प्रत्येकी एका उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता. लोकसभा व विधानसभेतील मतांची संख्या पाहता, तूर्तास काँग्रेसला तरी या ठिकाणी आहे त्या जागेवरील सत्ता टिकवण्याचे आव्हान असेल. नव्या प्रभाग रचनेनंतर वॉर्डमध्ये अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी प्रत्येकी एक प्रभाग राखीव झाला आहे तर पाच खुले प्रभाग निर्माण झाले आहेत. खुल्या प्रभागांमधील दोन प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत. राणीबागेचा मुद्दा गाजणार!राणीबाग हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्राणिसंग्रहालय ‘ई’ वॉर्डमध्ये येते. राणीबागेचा रखडलेला पुनर्विकास व नुकतेच मरण पावलेले पेंग्विन हे कळीचे मुद्दे ठरतील. मातंग समाजाची मते मिळवण्यासाठी अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचा विषयही वापरला जाईल. ‘अभासे’ची वाट बिकट!गीता गवळी आणि वंदना गवळी या दोन्ही नगरसेविकांच्या प्रभागात बरेच बदल झाले आहेत. त्यात गेल्या वेळी अपक्ष राहत गवळी यांना बऱ्यापैकी टक्कर दिलेल्या रोहिदास लोखंडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याशिवाय विधानसभेत गवळी यांच्या प्रभागातून खोऱ्याने मते मिळवलेल्या एमआयएमचे आव्हानही गवळी यांच्यासमोर राहील.मनसे डोके वर काढणार?गेल्या निवडणुकीत एक जागा जिंकून मनसेला दोन जागांवर थोडक्यात पराभव पत्करावा लागला होता. नव्या प्रभाग रचनेला फायदा शिवसेनेसोबत मनसेलाही होणार आहे. त्यामुळे अभासेसोबत युती तोडल्यानंतर शिवसेना किंवा मनसेच्या जागांत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.प्रभाग क्रमांक - २०७आरक्षण खुला (महिला)एकूण लोकसंख्या : ५३,८४८अनुसूचित जाती : ५,२५३अनुसूचित जमाती : ३३७प्रभागाची व्याप्ती : कस्तुरबा रुग्णालय, भायखळा रेल्वे स्थानक, डॉ. कंपाउंडप्रभाग क्रमांक - २०८आरक्षण खुलाएकूण लोकसंख्या : ५७,१२१अनुसूचित जाती : २,१५२अनुसूचित जमाती : ३४७प्रभागाची व्याप्ती : फेरबंदर, जिजामाता उद्यान, घोडपदेव, ठक्कर इस्टेटप्रभाग क्रमांक - २०९आरक्षण खुलाएकूण लोकसंख्या : ५५,६२२अनुसूचित जाती : ३,३५५अनुसूचित जमाती : ९२६प्रभागाची व्याप्ती : दारुखाना, एकतानगर, वाडी बंदर व अंजीरवाडीप्रभाग क्रमांक - २१०आरक्षण अनुसूचित जाती (महिला)एकूण लोकसंख्या : ५२,०७०अनुसूचित जाती : ५,८७८अनुसूचित जमाती : ४२९प्रभागाची व्याप्ती : जे.जे. रुग्णालय, ताडवाडी, मुस्तफा बाजारप्रभाग क्रमांक - २११आरक्षण इतर मागासवर्गएकूण लोकसंख्या : ५९,६४१अनुसूचित जाती : ४१०अनुसूचित जमाती : ११४प्रभागाची व्याप्ती : मदनपुरा, न्यू नागपाडा, भायखळा अग्निशमन दल केंद्रप्रभाग क्रमांक -२१२आरक्षण खुला (महिला)एकूण लोकसंख्या : ५६,२७८अनुसूचित जाती : २,१७८अनुसूचित जमाती : १४१प्रभागाची व्याप्ती : आग्रीपाडा, आर.टी.ओ., भायखळा (प), वाय.एम.सी. मैदानप्रभाग क्रमांक - २१३आरक्षण खुलाएकूण लोकसंख्या : ५८,२८७अनुसूचित जाती : २,९६६अनुसूचित जमाती : ३१३प्रभागाची व्याप्ती : काजीपुरा, सिद्धार्थनगर, छोटा सोनापूर२०१२मधील ई वॉर्डातील विजयी आणि पराभूत उमेदवारवॉर्डविजयी उमेदवारप्राप्त मतेपराभूत उमेदवारप्राप्त मते२०२समिता नाईक (मनसे)९,३०९स्मिता बनसोड (राष्ट्रवादी काँग्रेस)६,९४०२०३रमाकांत रहाटे (शिवसेना)९,९८५नितीन केरकर (मनसे)८,६१४२०४वंदना गवळी (अभासे)८,२७९रोहिदास लोखंडे (अपक्ष)५,२५७२०५गीता गवळी (अभासे)९,१३८अब्दुल काजी (काँग्रेस)४,३४०२०६फैयाज खान (काँग्रेस)१०,८६०भारतकुमार जैन (भाजपा)२,७२२२०७यामिनी जाधव (शिवसेना)७,१५६हर्षदा सुर्वे (राष्ट्रवादी काँग्रेस)६,१०४२०८मनोज जामसुतकर (काँग्रेस)७,५८१यशवंत जाधव (शिवसेना)४,५४६२०९शहाना खान (काँग्रेस)६,५९६आशा मामिडी (मनसे)६,२३१