धक्कादायक : आयुक्तालय-पोलीस ठाण्यांकडील संख्येत फरकपुणे : शहरातील शस्त्रपरवानाधारक आणि पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडे असलेल्या नोंदीमध्ये मोठी तफावत आढळून आली असून, तब्बल २० हजारांचा हा फरक असल्याचे समोर आले आहे. हा आकड्यांचा घोळ नेमका कुठे आहे, याचा शोध आता पोलीस आयुक्तालय घेत आहे.शहरात तब्बल ३० हजार शस्त्रपरवानाधारक आहेत. पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, बंदुकांसह विविध प्रकारच्या अग्निशस्त्रांचा त्यामध्ये समावेश आहे. उपलब्ध रेकॉर्डनुसार, ३० हजार शस्त्रधारी असल्याचे दिसत असले तरी नोंद मात्र केवळ १० हजार शस्त्रधारकांचीच आहे. उर्वरित २० हजार शस्त्रांबाबत संभ्रम आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके यांनी या विषयामध्ये लक्ष घालून ही तफावत शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी २० वर्षांपूर्वीपासूनचे अभिलेख तपासण्यात येत आहेत. गुरुवारी पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबतच्या सूचना देण्यात आल्या.
शस्त्रपरवानाधारकांच्या नोंदीत घोळ
By admin | Updated: February 7, 2015 02:56 IST