शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सी-लिंकचा प्रवास उड्डाणपुलावरून

By admin | Updated: September 21, 2016 02:31 IST

व्यावसायिक कंपन्यांची कार्यालये, हॉटेल्स आणि विविध दूतावासांची कार्यालये असल्याने वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात वाहनांची कायम वर्दळ असते.

मुंबई : विविध आर्थिक संस्था, व्यावसायिक कंपन्यांची कार्यालये, हॉटेल्स आणि विविध दूतावासांची कार्यालये असल्याने वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात वाहनांची कायम वर्दळ असते. त्यामुळे येथे होणारी कोंडी सोडविण्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुल व परिसरात चार उड्डाणपूल व एका रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे. यातील दोन उड्डाणपूल सी-लिंकपर्यंत येण्या-जाण्यासाठी बांधण्यात येतील, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. उड्डाणपूल आणि रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी सिमप्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पॅडेको कंपनी लिमिटेडची नेमणूक करण्यासाठी मंजुरीही देण्यात आल्याचे सांगण्यात आले. वांद्रे-कुर्ला संकुलास भेट देणाऱ्यांची संख्या आणि वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संकुलासह कलानगर जंक्शनजवळ मोठी वाहतूककोंडी होते. या कोंडीवर उपाय म्हणून चार उड्डाणपूल आणि एका रस्त्याचे बांधकाम करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. कलानगर जंक्शनजवळील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पहिल्या टप्प्यातील दोन उड्डाणपूल आणि धारावीपासून सी-लिंककडे जाणाऱ्या वळण रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी सिमप्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चरची नेमणूक करण्यात आली आहे. तर वांद्रे-कुर्ला संकुल आणि सांताक्रुझ-चेंबूर जंक्शनवरील वाहतूककोंडी सोडवण्याकरिता बांधण्यात येणाऱ्या दोन उन्नत मार्गांच्या कामांसाठी पॅडेको कंपनीची नेमणूक करण्यात आल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यात दोन उड्डाणपूल बांधताना यातील एक उड्डाणपूल संकुलापासून सी-लिंकपर्यंत जाईल तर दुसरा उड्डाणपूल सी-लिंककडून संकुलाच्या दिशेने परत येईल. त्याचबरोबर धारावी ते सी-लिंक असा रस्ताही पहिल्या टप्प्यात बांधला जाईल. दुसऱ्या टप्प्यात संकुलापासून पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाणारा व धारावीपासून पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणारा द्वितीय स्तरावरील उड्डाणपूल (उन्नत मार्ग) बांधणार असल्याचे एमएमआरडीने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>उन्नत मार्गाचा फायदादोन उन्नत मार्गांच्या बांधकामांवर पॅडेको कंपनीकडून देखरेख ठेवण्यात येईल.एका १.३ किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे वांद्रे-कुर्ला संकुल जंक्शनवरील वाहतूककोंडीवरील उपाय सापडणार आहे. तर कुर्लातील कपाडीयानगरपासून पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील वाकोलापर्यंतच्या ३.८९ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या उन्नत मार्गामुळे सांताक्रुझ-चेंबूर जंक्शनवरील वाहतूककोंडी सोडविणे शक्य होईल.