शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अधिवेशनावर उधळपट्टी! भाड्याच्या वस्तुंवर २ कोटी; चमचे, ब्लँकेट, प्लॅस्टिकचे मग, गाद्याही घेतल्या भाडेतत्त्वावर

By अतुल कुलकर्णी | Updated: December 14, 2017 07:05 IST

प्रशासकीय खर्चात काटकसर करण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला असताना, विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनासाठी ब्लँकेट, गाद्या, उशा, प्लॅस्टिकचे मग, चमचे, टीव्ही संच अशा वस्तू भाडेतत्त्वावर घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने २ कोटी ६४ हजार रुपये खर्च केले आहेत.

मुंबई : प्रशासकीय खर्चात काटकसर करण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला असताना, विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनासाठी ब्लँकेट, गाद्या, उशा, प्लॅस्टिकचे मग, चमचे, टीव्ही संच अशा वस्तू भाडेतत्त्वावर घेण्यासाठीसार्वजनिक बांधकाम विभागाने २ कोटी ६४ हजार रुपये खर्च केले आहेत. एवढ्या खर्चात या वस्तू विकतच मिळाल्या असत्या, असे या विभागातील काही अधिका-यांचे म्हणणे आहे.अधिवेशनासाठी राज्यभरातून पोलीस बंदोबस्त येत असताना, गतवर्षी खासगी सुरक्षा रक्षकांवर ३६ लाख रुपये खर्च केले होते. यंदाही तोच कित्ता गिरविण्यात आला आहे. वर उल्लेखलेल्या किरकोळ वस्तू भाडेतत्त्वावर घेण्यासाठी सुमारे दोन कोटीचे टेंडर काढले. शिवाय, ही बाब गुप्त राहावी, यासाठी टेंडरवर ‘कॉन्फिडेंशियल’ (गोपनीय) असा उल्लेख केला आहे. या वस्तू दर वेळी भाडेतत्त्वावर घेण्यापेक्षा त्या कायमस्वरूपी विकत घेतल्यास स्वस्त पडतील, असा सल्ला देणा-या अधिका-यांना या व्यवहाराच्या प्रक्रियेतूनच बाजूला केले गेल्याचे सूत्रांनी सांगितले.- नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग वारेमाप उधळपट्टी करत असल्याची बाब गेल्या वर्षीही ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती.टीव्हीचे भाडे आणि बाजारमूल्य२१ इंची कलर टीव्ही बाजारात साधारणपणे १३ हजाराला आणि ३२ इंची एलसीडी टीव्ही १९ हजारांना मिळत असताना, अधिवेशनासाठी २१ इंची ३९० टीव्ही आणि ३२ इंची २४८ टीव्ही संच २१ दिवसांसाठी भाड्याने घेण्यासाठी ६३,३०,०३० रुपयांचे टेंडर काढले आहे.हेच टीव्ही संच विकत घेतले गेले असते, तर त्यासाठी ९७,८२,००० रुपये लागेल असते.काय काय भाड्याने घेतले?22000- वुलन ब्लँकेट, गाद्या, बेडशीट, उशा2200 स्टीलची कॉट200 - प्लॅस्टिक ड्रम250 - लोखंडी कढई170 - हँड वॉश बेसिन200 - लोखंडी झारे200 - तवे60 - मसाला दळणयंत्र1200 - प्लॅस्टिक बकेट, प्लॅस्टिक जग, प्लॅस्टिक मग1700 - लोखंडी टेबल1500 - स्टील टेबल5000 - स्टीलचे चमचे- ३१ वस्तुंसाठी २ कोटी ६४ हजार ८९१ रुपयांचे टेंडर बांधकाम विभागाने काढले आहे.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७