शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये बसस्थानकात लागलेल्या खाजगी बसेस कर्मचा-यांनी लावल्या पिटाळून, प्रवाशांचे प्रचंड हाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 11:04 IST

गोरगरीब आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली एस.टी. बससेवा आज सकाळपासून ठप्प झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळे  बसगाड्या बसस्थानकाबाहेर जाऊ देण्यात येत नाहीत. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

ठळक मुद्देमध्यवर्ती बसस्थानकात लावण्यात आलेल्या खाजगी बसेस एसटी कर्मचा-यांनी पिटाळून लावले.कर्मचा-यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने पहाटेपासूनच संपाचा परिणाम जाणवला. बसस्थानकांत बसगाड्यांच्या रांगा

औरंगाबाद : गोरगरीब आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली एस.टी. बससेवा आज सकाळपासून ठप्प झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपामुळे  बसगाड्या बसस्थानकाबाहेर जाऊ देण्यात येत नाहीत. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.यातच मध्यवर्ती बसस्थानकात लावण्यात आलेल्या खाजगी बसेस एसटी कर्मचा-यांनी पिटाळून लावले.

एसटी कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले. त्यास कर्मचा-यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने पहाटेपासूनच संपाचा परिणाम जाणवला. मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानकात सकाळपासूनच प्रवाशांचे हाल होत आहे. बहुतेक प्रवाशांना संपाची कल्पना नसल्याने त्यांनी चौकशी कक्षावर धाव घेत आहे. परंतु बससेवा बंद असल्याची माहिती देण्यात येत आहे. एखादी तरी बस मिळेल या आशेने प्रवासी धडपडत करीत आहे.बस फे-या रद्द झाल्याने शेकडो  प्रवासी तासनतास बसस्थानकात खोळंबले. 

कर्मचा-यांच्या संपामुळे दिवाळीसाठी गावी जाणा-या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.  बस  कधी जाणार? अशी विचारणा करीत प्रवासी एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी गर्दी करीत आहे. यामध्ये ज्येष्ठ प्रवासी,लहान मुले आणि विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत.

खाजगी वाहतुकदारांकडून लूटबसस्थानकात तासनतास थांबूनही बस जाणार नसल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी खाजगी बसचा रस्ता धरीत आहे. मध्यवर्ती बसस्थानकासमोर खाजगी बसच्या रांगा लागल्या आहेत. परंतु अशा परिस्थितीत खाजगी वाहतुकदारांनी जादा भाडे घेऊन प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे. . एस.टी.कर्मचा-यांच्या संपामुळे नाईलाजाने प्रवाशांनी हा भुर्दंड सहन करून प्रवासाचा मार्ग धरत आहे.

शहर बससेवाही बंदशहर बससेवाही बंद पाडण्यात आली. त्यामुळे शहरवासीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहर बस बंद राहिल्याने रिक्षाचालकही प्रवाशांकडून जादा पैसे आकारत आहेत.

बसस्थानकांत बसगाड्यांच्या रांगासंपामुळे बसगाड्या बाहेर पडून देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही बसस्थानकांमध्ये बसगाड्यांच्या लांब रांगा लागल्या आहेत.