शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बर्निंग लोटस्

By admin | Updated: July 19, 2014 02:51 IST

अंधेरी पश्चिमेकडील लिंकरोडवरील लोटस् बिझनेस पार्कच्या बावीस मजली इमारतीच्या एकविसाव्या मजल्यावर लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू

मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील लिंकरोडवरील लोटस् बिझनेस पार्कच्या बावीस मजली इमारतीच्या एकविसाव्या मजल्यावर लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नितीन इवलेकर (३४) असे या शहीद जवानाचे नाव आहे. तर या दुर्घटनेत वीस जवान जखमी झाले असून, जखमींना कूपर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या आगीत इमारतीचे तीन मजले जळून खाक झाले असून, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. तब्बल सहा तासांच्या थरारक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.लोटस् बिझनेस पार्क ही व्यावसायिक आणि रहिवासी इमारत आहे. या इमारतीमध्ये दीड ते दोन हजार कर्मचारी काम करतात. शिवाय या इमारतीच्या तीन मजल्यांवर बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनसह अन्य मोठ्या व्यक्तींची कार्यालये आहेत. या इमारतीमध्ये २२व्या मजल्यावर एका एडिटिंग कंपनीच्या आॅफिसच्या कँटिनमधून ९.१५ वाजण्याच्या सुमारास धूर येऊ लागला. या घटनेची माहिती तत्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या वतीने ताबडतोब घटनास्थळी २२ गाड्या (बंब) आणि १२ टँकर रवाना करण्यात आले. मात्र अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचेपर्यंत इमारतीमधील आगीचे लोण वाढतच जाऊ लागले; शिवाय पावसाने दडी मारल्याने आणि वेगाने वारे वाहत असल्याने एकविसाव्या मजल्यावर लागलेली आग आणखीच पसरत गेली तर दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीच्या आसपासचा परिसर तत्काळ रिकामा करण्यात आला.

लोटस् बिझनेस बर्निंग लोटस पार्क या इमारतीची आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना प्रथमत: येथील चिंचोळे रस्ते, वाहनांची गर्दी, इमारतीमधून बाहेर पडणारा कर्मचारी वर्ग आणि बघ्यांची गर्दी या अडथळ्यांचा सामना करावा लागला. कालांतराने इमारतीची आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३३ कर्मचाऱ्यांनी इमारतीमध्ये प्रवेश केला. मात्र आगीचे लोण आणि धुराचे लोट याचा प्रवाह जोरदार असल्याने आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळे येत होते. त्याचवेळी आग विझविण्यासाठी इमारतीमध्ये प्रवेश केलेले ३३ कर्मचारीदेखील इमारतीमध्ये अडकून पडले. या जवानांना वाचविण्यासाठी घटनास्थळी थेट तटरक्षक दलाची दोन हेलिकॉप्टर्स धाडण्यात आली.दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची गर्दी वाढतच होती तर अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आग लागलेल्या इमारतीच्या तेराव्या मजल्यावरील लिफ्टमध्ये एक महिला अडकून पडली होती. या महिलेनेच तशी माहिती नियंत्रण कक्षाला फोनवरून दिली. आग विझवितानाच आगीत सापडलेल्या कर्मचारी वर्गाला इमारतीमधून सुरक्षित बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांना करावे लागले. तर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर्सच्या मदतीने इमारतीमध्ये अडकलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सहाएक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले; व दु.३ वाजताच्या दरम्यान लोटस् बिझनेस पार्कमधील आग आटोक्यात आली. आग लागलेल्या इमारतीमध्ये मोठ्या व्यक्तींची कार्यालये असल्याने घटनास्थळी सर्वांचीच गर्दी झाली होती. त्यांच्यामध्ये हृतिक रोशन याचाही समावेश होता. (प्रतिनिधी)