शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनचा १३५ किमीचा मार्ग ४ वर्षात, मुंबई-अहमदाबाद मार्गातील महाराष्ट्रातील सर्वात मोठा टप्पा

By नारायण जाधव | Updated: June 18, 2023 06:37 IST

या बांधकामात या मार्गावरील महाराष्ट्रातील ठाणे, विरार आणि बोईसर या तीन उन्नत स्थानकांचाही समावेश  आहे. यामुळे येत्या चार वर्षे दोन महिन्यांत राज्यातील ही तिन्ही स्थानके आकार घेणार आहेत. 

नवी मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गातील महाराष्ट्रातील सर्वात मोठा टप्पा असलेल्या पॅकेज-३ मधील ठाणे जिल्ह्यातील शीळफाटा ते पालघर जिल्ह्यातील गुजरात सीमेपर्यंतचा झरोली हा १३५.४५ किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याचे कंत्राट एल ॲण्ड टी कंपनीने  जिंकले आहे. एल ॲण्ड टी कंपनीची १५,६९७ कोटींची निविदा एनएचएसआरसीएल अर्थात नॅशनल हायस्पीड काॅर्पोरेशनने शुक्रवारी मंजूर केली. या बांधकामात या मार्गावरील महाराष्ट्रातील ठाणे, विरार आणि बोईसर या तीन उन्नत स्थानकांचाही समावेश  आहे. यामुळे येत्या चार वर्षे दोन महिन्यांत राज्यातील ही तिन्ही स्थानके आकार घेणार आहेत. 

एनएचएसआरसीएलने समुद्राखालील ७ किलोमीटरच्या जगातील पहिल्या बोगद्यासह बीकेसी ते शीळफाट्यापर्यंतच्या २१ किलोमीटर भूमिगत मार्ग बांधण्याच्या ६३९७ कोटींच्या कामासाठी ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शन्ससोबत करार केला. त्यानंतर राज्यातील सर्वात लांब १३५ किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याचे कंत्राट एल ॲण्ड टीने  जिंकले.  यात दिनेशचंद्र-डीएमआरसी जेव्ही, लार्सन ॲण्ड टुब्रो, ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शन्स-केपीटीएल आणि एनसीसी - जे. कुमार यांचा समावेश होता.  १५,६९७ कोटींची निविदा भरणाऱ्या लार्सन ॲण्ड टुब्रोने बाजी जिंकली.

पॅकेज ३ मध्ये या कामांचा आहे समावेशमहाराष्ट्र राज्यातील शीळफाटा आणि झरोलीदरम्यान ठाणे, विरार आणि बोईसर या उन्नत स्थानकांसह १३५  किलोमीटर लांबीच्या व्हायाडक्ट्स, पूल आणि माउंटन टनेलच्या सिव्हिल आणि बिल्डिंग कामांच्या डिझाइन आणि बांधकामाचा समावेश आहे. या मार्गात नद्यांवरील ११ पूल, डोंगरांखालील ६ बोगदे आणि इतर ३६ पुलांचा समावेश आहे. राज्यातील तुंगारेश्वर अभयारण्यासह  पालघर  जिल्ह्यातील पर्यावरणीयदृष्ट्या अनेक संवेदनशील भागातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार आहे.

बीकेसी भूमिगत स्थानकाचे काम सुरूमुंबईतील बीकेसी येथील भूमिगत स्थानकाचे कंत्राट एमएईआयएल-एचसीसी कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीची ३६८१ कोटींची निविदा मान्य करण्यात आली. ४.९ हेक्टरवर हे स्थानक होणार असून, यात फलाटांची लांबी ४१४ मीटर आहे. येथून १६ काेचची बुलेट ट्रेन ये-जा करू शकेल.

भिवंडी तालुक्यात असणार डेपो भारोडी व अंजूर गावाजवळील ६० हेक्टर जमिनीवर हा डेपो असेल. बुलेट ट्रेनसाठी प्रसिद्ध असलेल्या शिंकनसेन ट्रेन-सेटची देखभाल या ठिकाणी करण्यात येणार आहे. साबरमती डेपोनंतर हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा डेपो असणार असून, आणखी एक डेपो सुरत येथे बांधण्यात येणार आहे. 

महाराष्ट्राची पाच हजार कोटींची हिस्सेदारीसत्तेवर येताच शिंदे सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्र सरकारचे शेअर खरेदीसाठी सहा कोटी रुपये वितरित केले आहेत.  या प्रकल्पात केंद्र सरकारची दहा हजार कोटी अर्थात ५० टक्के तर महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची प्रत्येकी २५ टक्के अर्थात पाच हजार कोटींची हिस्सेदारी आहे. 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन