शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीला ओसी नसल्यास वास्तव्य भोवणार; महारेराचे कारवाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 05:40 IST

जमीन मालक आणि विकासक यांच्यातील वादाचा फटका रहिवाशांना बसण्याची चिन्हे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इमारतीला वापर परवाना (ओसी) नसतानाही राज्यातील प्रत्येक शहरांत हजारो कुटुंबांचे तेथे वास्तव्य आहे. नुकतेच मुळशी येथील एका बांधकाम प्रकल्पाला ओसी नसतानाही तेथे वास्तव्य केल्याप्रकरणी ४५ घरमालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश महारेराने दिले आहेत. जमीन मालक आणि विकासक यांच्यातील वादाचा फटका रहिवाशांना बसण्याची चिन्हे आहेत.

अशा स्वरूपाचा महारेराने दिलेला हा पहिलाच आदेश असल्याचे सांगितले जात आहे. मुळशी तालुक्यात राजकुमार, संजय आणि विजय सस्ते या तीन भावांच्या मालकीच्या जमिनीवर निवृत्ती हाइट्स हा बांधकाम प्रकल्प उभारणीसाठी निरंजन आणि दत्तात्रय दशपुते या विकासकांशी करार करण्यात आला होता. त्यासाठी ९ जुलै, २०१२ मध्ये सस्ते बंधूंनी कुलमुखत्यारपत्रही दिले होते. करारानुसार या भावंडांना प्रकल्पात २६ हजार ५०० चौरस फुटांचे निवासी आणि १४८० चौरस फूट व्यावसायिक बांधकाम क्षेत्र दिले जाणार होते. मात्र, कालांतराने या करारावरून जमीन मालक आणि विकासकांमध्ये वाद झाला. तेव्हापासून जमीन मालक प्रकल्पाचे काम पूर्ण करू देत नसल्याची तक्रार विकासकांनी महारेराकडे दाखल केली होती.तर, विकासकाने करारातील अटी-शर्तींचा भंग केल्याने तो रद्द करून कुलमुखत्यारपत्रानुसार दिलेले अधिकार मागे घेत असल्याचे विकासकांना कळविल्याचा युक्तिवाद जमीन मालकांकडून केला जात होता. प्रकल्पातील बांधकामांना वापर परवाना नसतानाही तेथे ४५ कुटुंबे वास्तव्याला असून विकासकाने मान्य केल्यानुसार तेथे सोयी-सुविधा नसल्याची बाब सस्ते बंधूंच्या वकिलांनी निदर्शनास आणली होती. या प्रकरणी महारेराचे सदस्य बी.डी. कापडणीस यांच्यासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.वादग्रस्त प्रकल्पाचामार्ग मोकळाजमीन मालकांनी प्रकल्प पूर्ण करण्याच्या मार्गात कोणत्याही स्वरूपाचे अडथळे निर्माण करू नयेत. विकासकांना लवकरात लवकर या प्रकल्पाचे शिल्लक काम पूर्ण करावे, असे आदेश कापडणीस यांनी दिले आहेत.ओसी नसतानाही येथे ४५ कुटुंबांचे वास्तव्य असल्याच्या मुद्दा त्यांनी दुर्लक्षित केला नाही. या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ही बाब प्राधिकरणाचे सदस्य पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना निदर्शनास आणतील, असेही आदेशात नमूद आहे.