शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामांच्या परवानगीसाठी आजपासून ‘बिल्डर झुंबड’

By admin | Updated: April 26, 2016 03:41 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील नवीन बांधकामांवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी उठवल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातवारण आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील नवीन बांधकामांवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी उठवल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातवारण आहे. वर्षभरानंतर बांधकाम परवानगीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मंगळवारपासून आता बांधकाम आराखडा मंजुरीसाठी केडीएमसीच्या नगररचना विभागात झुंबड उडणार आहे.घनकचऱ्याचे व्यवस्थापन न केल्याने उच्च न्यायालयाने नवीन बांधकामांवर बंदी घातली होती. त्यामुळे वर्षभरात बांधकाम क्षेत्राला ४०० ते ५०० कोटींचा फटका बसल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या ‘एमसीएचआय’ने केला आहे. २०१४-१५ मध्ये १६८ बांधकाम आराखड्यांना मंजुरी देण्यात आली होती. यात कल्याणमधील ११० तर डोंबिवलीतील ५८ बांधकामे होती. कल्याण-डोंबिवलीतील घनकचरा प्रकरणातील याचिकेवर १३ एप्रिल २०१५ ला झालेल्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने नवीन बांधकामांना बंदी घातली. तेव्हापासून आतापर्यंत नवीन बांधकाम परवानग्या देण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे बांधकाम क्षेत्राबरोबरच महापालिकेचेही कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दरम्यान, बांधकामावर निर्बंध येताच ‘एमसीएचआय’ व काही वास्तुविशारदांनी या निर्णयाविरोधात दाद मागितली होती. नवीन बांधकामाला बंदी घातल्यामुळे बेकायदा बांधकामांत वाढ होईल, याकडे लक्ष वेधले होते. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात केडीएमसीने कार्यवाही सुरू केल्याने बंदी उठवण्यात आली आहे. अखेर, वर्षभरानंतर का होईना, न्याय मिळाल्याने बांधकाम व्यावसायिकांत आनंदाचे वातावरण आहे. ‘एमसीएचआय’चे अध्यक्ष प्रफुल्ल शहा यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.