शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
4
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
5
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
6
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
7
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
8
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
9
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
10
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
11
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
12
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
13
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
14
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
15
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
16
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
17
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
18
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
19
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

बिल्डर फसवणुकीची एसआयटी कल्याणमध्ये कागदावरच

By admin | Updated: June 8, 2016 02:29 IST

स्वस्त घरांचे प्रलोभन दाखवून कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची ३५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली.

मुरलीधर भवार,

कल्याण- स्वस्त घरांचे प्रलोभन दाखवून कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची ३५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. विविध पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे २० गुन्हे दाखल झाल्याने पोलीस उपायुक्तांनी त्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची घोषणा केली. त्याला सहा महिने उलटले, तरी या गुन्ह्यांचा तपास अजूनही झालेला नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळणार का, त्यांनी गुंतविलेले पैसे परत मिळणार का, याचे उत्तर मिळालेले नाही. बिल्डरांवर कारवाईत पोलिसांचे हात अचानक बांधले गेल्याने फसवले गेलेले नागरिक पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवत आहेत. गेल्या वर्षभरात स्वस्त घरांचे प्रलोभन दाखवून विविध बिल्डरांनी बेकायदा घरविक्रीची दुकाने थाटली होती. नागरिकांकडून घराच्या बदल्यात बुकिंगचे पैसे घेतले. पण घरे न दिल्याने, पैसेही परत न केल्याने महात्मा फुले चौक पोलीस ठाणे आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आतापर्यंत २० गुन्हे दाखल झाले आहेत.या गुन्ह्यात दोन हजार ७०० नागरिकांची फसवणूक झाली आहे. विविध बिल्डरांनी त्यांना जवळपास ३५ कोटीपेक्षा जास्त रुपयांना गंडा घातला आहे. ‘स्वस्तिक’, ‘गजानन होम्स’ आणि ‘आकृती बिल्डर’ यांनी कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याने त्यांची स्थानिक पोलीस ठाणे आणि आर्थिक गुन्हे शाखा अशा दोन्ही पातळीवर चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत विविध गुन्ह्यांत ३९ जणांना अटक केली आहे. त्यांची बँक खाती सील केली आहेत. नागरिकांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. ‘स्वस्तिक’, ‘गजानन होम्स’ आणि ‘आकृती बिल्डर’ व्यतिरिक्त ‘एव्हरेस्ट’, ‘ओमसाई’, ‘त्रिमूर्ती’, ‘उमंग’, ‘पांडू’, ‘एकविरा’, ‘साईकृपा’, ‘आमंत्रण’, ‘साई लीला’, ‘आशीर्वाद’, ‘शुभारंभ’, ‘सनसिटी’, ‘मंगलमूर्ती’ आणि ‘ओंकार’ या बिल्डरांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. २० गुन्ह्यांपैकी ‘गजानन होम्स’, ‘ओमसाई’, ‘आकृती’, ‘त्रिमूर्ती’, ‘ग्रीनसिटी’ आणि ‘आशीर्वाद’ या सहा बिल्डरांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.या बिल्डरांनी अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी येथील ब्रिटिशकालीन विमानतळाच्या जागेवर बेकायदा घरे उभारली होती. ही जागा सध्या हवाई दलाच्या ताब्यात आहे. यातील काही घरे सॅम्पल म्हणूनही दाखविण्यात आली. धनादेश आणि रोख रक्कम घेऊन बिल्डरांनी नागरिकांची फसवणूक केली. पाच लाखांत वन बीएचके देण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले होेते. ‘ओमसाई बिल्डर’ने फसवणूक केल्याप्रकरणी सुनील पोटे याला अटक झाली होती. त्याने नागरिकांकडून उकळलेल्या पैशातून पनवेल, मुंबई, पुणे, सातारा या परिसरात जमीन घेतली होती. टिटवाळा परिसरात पोटेने फसवणूक केल्याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याआधी कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली होती. पोटे याच्या भावाला त्याच्या आधीच पनवेलमधील ‘स्वप्ननगरी होम्स’मध्ये फसवणूक केल्याप्रकरणी अटक झाली होती. तो न्यायालयीन कोठडीत होता.विधिमंडळातही गाजला मुद्दाबिल्डरकडून फसवणूक झालेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी तत्कालीन पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी डिसेंबर २०१५ मध्ये एसआयटी नेमली होती. त्याबाबतचा मुद्दा कल्याण-डोंबिलीतील आमदारांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यामुळे पोलिसांना एसआयटी नेमावी लागली होती. मात्र, या एसआयटीने फारसे समाधानकारक काम केलेले नाही. तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप फसवणूक झालेल्या नागरिकांकडून होत आहे. सहा महिने उलटून गेले तरी त्यांना न्याय मिळालेला नाही.जाहिराती पुन्हा झळकल्या, कार्यालयेही सुरूफसवणुकीची प्रकरणे समोर आली तेव्हा शहरातील स्वस्त दरात घर देण्याच्या जाहिराती करणाऱ्या बिल्डरांच्या कार्यालयांची झाडाझडती घेण्याचे सत्र सुरू झाले होते. काही कार्यालये बंद करण्यात आली होती. तर काहींनी स्वत:च कुलूप लावून धूम ठोकली होती. आता काही ठिकाणी पुन्हा या जाहिराती झळकू लागल्या आहेत. त्यांची कार्यालयेही पाहायला मिळत आहेत. >‘मोक्का’साठी गाइडलाइन नाहीविधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात बेकायदा बांधकाम प्रकरणासह बिल्डरांकडून फसविलेल्या गेलेल्यांचा मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक करणाऱ्या बिल्डरांविरोधात ‘मोक्का’अन्वये कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे या २० बिल्डरांविरोधात ‘मोक्का’ लावला जाईल का, असा सवाल तपास यंत्रणेतील काहींना विचारला असता त्यांनी तशा पद्धतीच्या कोणत्याही गाइडलाइन आलेल्या नाहीत, असे सांगितले. एका अधिकाऱ्याने ‘मोक्का’ का लावला जाऊ नये, असा सवाल करून तो लावला जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नवे पोलीस उपायुक्त फसवणुकीचा तपास गतीमान करतील, अशी अपेक्षाही पोलिसांनी आणि फसवल्या गेलेल्या नागरिकांनी व्यक्त केली जात आहे.