शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2022: मराठवाड्यातील छोट्या शेतातून घेतली भरारी; देशाचं बजेट सादर करण्याची मोठी जबाबदारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 09:57 IST

Dr. Bhagwat Karad will Present Budget 2022: स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच औरंगाबादला केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने स्थान मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट (अर्थसंकल्प) सादर करणाऱ्या प्रमुख टीममध्ये असणार आहेत.

सुपर स्पेशालिस्ट बालरोग शल्यचिकित्सक ते लोकसेवक असा प्रवास केलेला मराठवाड्याचा सुपुत्र आज देशाचे बजेट सादर करणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत अर्थसंकल्प मांडतील. मराठवाड्यातील अनेक प्रकल्प रखडलेले आहेत, यामुळे या प्रकल्पांसह नवीन काय मिळेल यावर नागरिकांचे लक्ष आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या भागवत कराड यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. 

स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच औरंगाबादला केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने स्थान मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय बजेट (अर्थसंकल्प) सादर करणाऱ्या प्रमुख टीममध्ये असणार आहेत. स्वातंत्र्यानंतर प्रथमच केंद्रीय बजेट प्रक्रियेत असण्याची संधी डॉ. कराड यांच्यामुळे मिळाल्याने ही औरंगाबादसाठी भूषणावह अशी बाब आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि डॉ. कराड बजेट सादर करतील. आपल्या आयुष्यातील ही मोठी संधी असून, विलक्षण आणि अविस्मरणीय असा हा क्षण असल्याचे डॉ. कराड यांनी बजेटच्या पूर्वसंध्येला लोकमतशी बोलताना सांगितले.

भागवत कराड यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण असताना सुरुवातीला ते आणि त्यांचे आई वडील कच्च्या घरात राहत होते. खडतर परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी डॉक्टर होण्यासाठी औरंगाबादचा रस्ता धरला आणि मराठवाड्याचे पहिले वहिले लहान मुलांवर उपचार करणारे सर्जन बनले. असे करताना त्यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष केले नाही. आपल्या भावंडांनाही शिकविले आणि दुसरीकडे वैद्यकीय सेवा आणि लोकसेवाही सुरु ठेवली. 

''जेव्हा तुम्ही यशाच्या किंवा एखाद्या शिखराच्या उत्तुंग शिखरावर असता तेव्हा तेथून पायऊतार व्हा, दुसरे शिखर गाठण्याचा प्रयत्न करा'', असे ते आपल्या मुलांना नेहमी सांगतात. पुढे जाऊन भागवत कराड हे औरंगाबादचे आधी उपमहापौर नंतर महापौर झाले. यानंतर राज्यसभेतून आता थेट केंद्रीय राज्य मंत्रीपद सांभाळत आहेत. भागवत कराडांच्या या प्रवासाविषयी त्यांचा मुलगा वरुण कराड यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे. मराठवाड्याच्या छोट्याशा शेतातून निघालेला मुलगा आज देशाचे बजेट मांडणार आहे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2023Bhagwat Karadडॉ. भागवत