शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2018 : सहकारी अर्थकारणाकडे दुर्लक्ष, पण ग्रामीण विकासाला पूरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 05:26 IST

अर्थसंकल्पात सहकारी अर्थकारणाचा प्रत्यक्ष उल्लेख नाही. तसेच ग्रामीण विकासासाठी प्रत्यक्ष तरतुदी नाहीत; पण शेतीसाठी केलेल्या तरतुदी एका अर्थाने ग्रामीण विकासाला पूरक आहेत.

- प्रा. डॉ. जे. एफ. पाटील( ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, कोल्हापूर.)अर्थसंकल्पात सहकारी अर्थकारणाचा प्रत्यक्ष उल्लेख नाही. तसेच ग्रामीण विकासासाठी प्रत्यक्ष तरतुदी नाहीत; पण शेतीसाठी केलेल्या तरतुदी एका अर्थाने ग्रामीण विकासाला पूरक आहेत. या तरतुदींमध्ये १) शेतमालाच्या किमान आधार किमती उत्पादन खर्चाच्या १५० टक्के होतील, अशी व्यवस्था करणे. २) शेतमालाच्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक बाजार व्यवस्थेशी (इनाम) कृषी उत्पन्न बाजार समिती जोडून घेणे. ३) शेतकरी उत्पादक संस्थांना प्रोत्साहक अंशदान देण्याचा प्रस्ताव.अंशदानाच्या तसेच करमुक्तीच्या योजना लागू करण्यात आल्या. ४) सिंचन व्यवस्था वाढविण्याच्या तरतुदी. ५) रस्तेविकास व रेल्वे विस्तार यांसाठी वाढीव खर्च. ६) शेती पतपुरवठ्यासाठी १० लाख कोटींवरून ११ लाख कोटी रुपयांची तरतूद यांचा समावेश आहे. उपरोक्त तरतुदींमुळे शेतीची उत्पादकता, रोजगार वाढविण्यासाठी मदत होईल असे वाटते. एकंदरीत पाहता हा अर्थसंकल्प राजकीय उद्दिष्टपूर्तीसाठी मांडला गेला.२०१९मध्ये होणाºया सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन मतदार प्रतिकूल होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न झाला आहे. ‘शेतकरी उत्पादक संस्था’ असे न म्हणता ‘सहकारी शेतीसंस्था’ असा शब्द वापरला असता तर बरे झाले असते. एका अर्थाने हा अर्थसंकल्प सहकारी अर्थकारणाकडे पूर्णत: दुर्लक्ष करणारा राजकीय स्वरूपाचा आहे. पूर्वीच्या ‘उज्ज्वला’ योजनेवरचा वाढीव खर्च, हा ग्रामीण विकासाचा अप्रत्यक्ष घटक आहे.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Budgetअर्थसंकल्प