शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

सिल्लोडमध्ये बोकडांचा बाजार तेजीत

By admin | Updated: September 7, 2016 19:33 IST

बकरी ईद तोंडावर आल्याने कुर्बानीमुळे बोकड, मेंढा, शेळी-मेंढीची मागणी प्रचंड वाढलेली असून, या बाजारात जाफरानी बकरा ५१ हजारांत विकला गेला.

श्यामकुमार पुरे/ऑनलाइन लोकमत

सिल्लोड, दि. 7 - तालुक्यातील भराडी व वदोडबाजार या दोन्ही गावाच्या आठवडी बाजारात बकरी ईद तोंडावर आल्याने कुर्बानीमुळे बोकड, मेंढा, शेळी-मेंढीची मागणी प्रचंड वाढलेली असून, या बाजारात जाफरानी बकरा ५१ हजारांत विकला गेला. तर काश्मिरी बोकड लाखाच्या खाली द्यायला मालक तयार झाला नाही. त्याची बोली मात्र 71 हजार पर्यंत लागली. या दोन बाजारात हजारो बोकडांच्या विक्रीतून पाच कोटीची उलाढाल झाल्याचे वडोद बाजार व भराडी स्थानिक बाजाराचे ठेकेदार गोविंद पांडे यांनी सांगितले आहे.बकरी ईद दिनदर्शिकेनुसार 12 सप्टेंबरला येत आहे, तर चंद्रदर्शन 1 दिवस उशिरा झाल्यामुळे बकरी ईद ( ईद उल जुहा) 13 सप्टेंबर मंगळवारी साजरी केली जाणार आहे. मुस्लिम समाजाचा त्यागाचा प्रतीक असलेल्या या सणाला समाज बांधव कुर्बानीसाठी सुंदर आणि आकर्षक देखणा गोंडस बकऱ्याची निवड करतात. पण त्याचबरोबर त्या जनावरांचा दात, हात, पाय कान, शिंग अशा प्रकारे शरीराचा कुठलाही अवयव तुटलेला नसावा. या बाबीही बारकाईने पाहतात. एरवी सरासरी वजनाकडे लक्ष देतात. मात्र अशा वेळी सुंदरता-देखण्यावरच बोकड खरेदीवर भर देत असल्यानेच बोकड -मेंढा ,शेळी-मेंढी बाजाराला तेजी आलेली आहे.51 हजारात जाफरानीअजुन बकरी ईद ला 4 दिवस बाकी असले तरी या दोन बाजारातच पाच कोटीच्यावर उलाढाल झाली असून लोणावळाच्या माजी नगराध्य सोमनाथ अन्सारी यांनी कुर्बानीसाठी जाफरानी जातीचा लांब केस उभे धारदार सिंग असलेला भारदस्त बोकड ५१ हजारात विकत घेतला आहे.

काश्मिरी बोकडाचे लागले 71 हजार..सिल्लोडच्या व्यापाऱ्याने मुंबईहून आणलेला कमी उंची असलेला सशासारखा गोंडस पांढरा शुभ्र काश्मिरी बोकडाची किंमत 71 हजार लावण्यात आली. पण बोकड बोरगाव सारवनी येथील व्यापाऱ्याने 1 लाख रुपयांपेक्षा कमीत देणार नाही, असा हट्ट वडोद बाजारमध्ये केला. म्हणून तो बोकड अजूनही विकला नाही. या शिवाय भराडीच्या बाजारात डोक्यावर चांद, तारा असलेल्या बोकडाचीही साठ हजाराच्या वर बोली लागली. तरीही एका लाखापेक्षा कमी किमतीत मालक विकायला तयारच नसल्याचे चित्र पहायला मिळाले. सिल्लोड परिसरातील भराडी व वदोडबाजार हे दोन्ही बाजार जिल्ह्यातच नव्हे तर राज्य परराज्यात प्रसिध्द आहेत.या बाजारात आसपासचे गोट फार्मचे चालक लहान सहान शेतकारीवर्गासह शेळी-मेंढी,बोकुड-मेंढपाळ दोन पैसे कमविण्याची संधी म्हणून खास करून बकरी ईदच्याच वेळी संभाळलेल्या अशा जनावरांची विक्री करतात.सर्वसामान्य अशा क्षेत्रातील व्यक्ती बकरी ईदच्या प्रतिक्षेतच असतात असे मोतीराम पंडित,सूर्यभान पाटील ,लक्ष्मण कल्याणकर, शेख पाशु याच्यासह अनेक जाणकारांनी बोलून दाखविले.खासकरून बकरी ईदच्या मूहर्तावार अधिकचे दोन पैसे कमविण्यासाठी दूर-दुरून राज्य व परराज्यातून खरेदीदार व व्यापारी गोट फार्मचे चालक,शेळी-मेंढी शेतकरी विशेष जातींच्या बोकुड-मेंढा तसेच शेळी-मेंढीसह जाफरानी, काश्मिरी, राजस्थानी, काठेवाडी, यासह महाराष्ट्रीयन पिवर गावरान होस्टन वगळता खरेदी करतात.कुर्बानी साठी कुठलेच अवयव कटलेले व कुठलेही आजार नसलेली जनावरेच बाजारात विण्यासाठी आणतात कारण मुस्लिम समाज अशाच जनावारांची कुर्बानी करतात ज्या मध्ये कुठलेच डाग नाही.

(सर्व छायाचित्रे- श्यामकुमार पुरे)