शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

भावांनो, आता तरी कामावर या! अपील करा; बडतर्फ कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 06:24 IST

कर्मचाऱ्यांनी १० मार्चपर्यंत कामावर येण्याचे आवाहन केले आहे. कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने बडतर्फी व सेवासमाप्ती या प्रकारची कारवाई करून घरी पाठविले आहे, अशा दहा हजारांवर कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याची तयारी महामंडळाने सुरू केल्याची माहिती आहे; मात्र या कर्मचाऱ्यांना यासाठी विभाग नियंत्रकांकडे अपील करायचे आहे. ही संधी किती कर्मचारी घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मागील सव्वातीन महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी कामावर यावे, यासाठी महामंडळाने विविध प्रयोग केले. बडतर्फ, निलंबन, कारणे दाखवा नोटीस, बदली अशाप्रकारची कारवाई करण्यात आली. यानंतरही कर्मचारी कामावर येण्यास तयार नाहीत. एसटीचे शासनात विलीनीकरण शक्य नाही, ही घोषणा शुक्रवारी झाल्यानंतर कर्मचारी कामावर येण्याची संख्या वाढेल, अशी अपेक्षा महामंडळाला होती. 

असे केले जाईल सामीलबडतर्फ कर्मचाऱ्यांना विभाग नियंत्रकांकडे अपील करावे लागेल. त्यावर सुनावणी होईल. त्यात कर्मचाऱ्याला कामावर घेण्याचा निर्णय घेतला जाईल. बडतर्फीच्या प्रकरणात कर्मचाऱ्याला कारवाईला सामोरे जावे लागते; मात्र कामावर रूजू होण्याचे मार्ग खुले होतात. 

सावध भूमिकाnकर्मचाऱ्यांनी १० मार्चपर्यंत कामावर येण्याचे आवाहन केले आहे. कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. nमहामंडळाने ४ व ५ मार्च या दोन दिवसांत दोन परिपत्रके काढली आहेत. त्यामध्ये संपामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करून घेण्यासाठी कोणतीही नोटीस देऊ नका, दिली असल्यास परत घेण्याच्या सूचना विभागीय कार्यालयांना करण्यात आल्या.

टॅग्स :ST Strikeएसटी संप