शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन २६ पूल धोकादायक

By admin | Updated: August 6, 2016 02:42 IST

महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील २६ ब्रिटिशकालीन पूल सरकारच्या हिटलिस्टवर आले आहेत

आविष्कार देसाई,

अलिबाग- महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील २६ ब्रिटिशकालीन पूल सरकारच्या हिटलिस्टवर आले आहेत. यामध्ये पाऊणशे वर्षांपासून नागोठणे येथील शिवकालीन असणारा ४३६ वर्षे जुन्या पुलाचा समावेश आहे. पुलाचे स्ट्रक्टरल आॅडिट करण्यासाठी अद्याप सरकारकडून आदेश आलेले नाहीत. पुलाचे आॅडिट न करता त्या पुलाखालून वाहणारी नदी, बेकायदा रेती उत्खनन, माती, पर्यावरण, आजूबाजूचा परिसर, बदललेली भौगोलिक स्थिती, तेथे असणारे अन्य पूल अशा विविध मुद्यांचे आॅडिट होण्याची गरज आहे. तसे झाले नाही तर महाडसारख्या अन्य दुर्घटना होऊन हजारो निष्पाप जीव पुन्हा जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.महाडमधील सावित्री नदीवरील पूल पडल्याने आतापर्यंत २२ जणांचे बळी गेले आहेत, तर अन्य बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यात येत आहे. महाडचा पूल पडल्याने सरकार खबडून जागे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सर्वच ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे फर्मान सोडले. ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलांनी जवळजवळ शंभरी पार केलेली आहे. त्यामुळे पूल बांधताना जी परिस्थिती होती, ती बदलली आहे, पर्यावरणामध्ये कमालीचा बदल झाला आहे. पुलांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा रेती उत्खनन होते. त्यामुळे रेती उत्खननाचा मुद्दा विचारात घेणे गरजेचे आहे. ब्रिटिश राजवटीत उभारण्यात आलेल्या पुलांबाबत मुदत संपल्यावर डागडुजीसाठी वेळच्या वेळी माहिती देण्यात येत आहे. परंतु स्थानिक प्रशासनाकडून पुलांच्या डागडुजीकडे तसेच देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. नदीच्या परिसरामध्ये वाढलेली नागरी वस्ती, ब्रिटिशांनी बांधलेल्या पुलाच्याच बाजूला नव्याने बांधलेले पूल यांचाही आॅडिटमध्ये प्राधान्यक्रमाने समावेश करणे आवश्यक आहे. तसे केले तरच परिपूर्ण आॅडिट होऊन नागरिकांचा प्रवास सुरक्षित होईल. रोहा : महाड येथील सावित्री नदीवरील ८८ वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्यानंतर राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. रोहा तालुक्यात एकूण ६ मोठे व ३३ लहान पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. मुंबई-गोवा महामार्गावरील निडी, वाकण, कोलाड या ठिकाणी मिळून चार मोठे पूल आहेत. यातील प्रमुख पुलांचे वयोमान ५० वर्षांहून अधिक आहे. रोहा-अष्टमीला जोडणारा जुना पूल कुंडलिकेच्या प्रवाहात आजही तग धरून आहे. १५८० मध्ये बांधण्यात आलेल्या शिवकालीन अंबा नदीवरील पुलावरून जाण्यास सध्या अवजड वाहने व बसला बंदी घालण्यात आली आहे. मात्र हलकी वाहने, दुचाकी आजही पुलाचा उपयोग करतात. या पुलामध्ये निडी, वाकण येथील अंबा नदीवरील पूल, कोलाडजवळील मिहसदरा व कुंडलिका नदीवरील पुलांचा समावेश आहे. हे चारही पूल मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थापनेपासून असल्याने ८० वर्षांहून अधिक जुने आहेत. आयपीसीएल कारखान्याकडे जाणारा पूल वगळता उर्वरित पुलांचे बांधकाम १९५९ ते १९६0 काळातील आहे. चारही पूल मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थापनेपासून असल्याने ८० वर्षांहून अधिक जुने आहेत. मोठ्या पुलांमध्ये ६ पुलांचा समावेश असून त्यांची लांबी किमान ३० मीटरहून अधिक आहे. यात रोहा शहर व अष्टमी गाव यांना जोडणारा कुंडलिका नदीवरील पूल, खारेपाटी गावाजवळील गुजर कातळजवळील पूल, निडी-भातसई गावांना जोडणारा पूल, वरसेतील गंगा नदीवर असणारा पूल, आयपीसीएल कारखान्याकडे जाण्यासाठी उभारलेला नागोठणेतील पूल आदींचा समावेश होतो. >जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत मिळालेल्या माहितीमध्ये २६ ब्रिटिश कालीन पूल आढळून आले आहेत. ती यादी अजूनही अपडेट होईल. सरकारकडून अद्यापही प्रशासनाला लेखी आदेश आलेले नाहीत.- सतीश बागल, निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड