शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मीनाकारी, एम्बॉसिंग पणत्यांची लखलख तेजाची दुनिया

By admin | Updated: October 19, 2016 04:14 IST

रंगीबेरंगी आकर्षक पणत्यांनी ठाण्याच्या बाजारपेठा सजू लागल्या आहेत.

प्रज्ञा म्हात्रे,

ठाणे- रंगीबेरंगी आकर्षक पणत्यांनी ठाण्याच्या बाजारपेठा सजू लागल्या आहेत. नवनवीन पणत्या, दिवे खरेदी करण्याकडे ठाणेकरांचा कल असल्याने यंदा मीनाकारी वर्क केलेल्या, गोल्ड प्लेटेड पणत्या बाजारात आल्या आहेत. हे दिवे ठाणेकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. यंदा मातीच्या पणत्या कमी दिसत असल्या तरी फ्लोटींग दिवे, शॅडो दिवे, लटकणारे दिवे, कॅण्डल स्टॅण्ड यांची चलती आहे. शॅडो दिवा हा एक वेगळा प्रकार विक्रीसाठी आला आहे. मेणाचा दिवा आणि त्यामागे गणपती, लक्ष्मी, स्वस्तीक, ओम यांची गोल्ड प्लेटेड मूर्ती आहे. हा दिवा पेटवल्यावर भिंतीवर या देवादिकांच्या मूर्तींची सावली दिसते. १४० रुपये या दिव्याची किंमत आहे. घरातील सजावटीसाठी लाकडापासून बनवलेली कोयरीच्या आकाराची पणती उपलब्ध आहे. वेगवेगळ््या रंगांच्या मण्यांनी ही पणती सजवली आहे. यात फुलेही ठेवू शकता, असे गाला यांनी सांगितले. ५३० रुपये अशी या पणतीची किंमत आहे. फ्लोटींग पणत्यांची क्रेझ कायम आहे. यात कॅण्डलवाली फ्लोटींग पणती आणि बॅटरीवर चालणारी फ्लोटींग पणती, असे दोन प्रकार आहेत. कॅण्डलची फ्लोटींग पणती ही १८० रुपये तर बॅटीरवर चालणारी फ्लोटींग पणती २२० रुपयांने मिळते. यात २५ प्रकार उपलब्ध आहेत. कॅण्डल स्टॅण्ड सेटही विक्रीसाठी आहे. लाकडाचे हे स्टॅण्ड असून त्यावर वेगवेगळे वर्क केले आहेत. नारळाच्या करवंटीमध्ये असलेले फ्लोटींग दिवे देखील लक्ष वेधून घेत आहे. ११० रुपये अशी या दिव्याची किंमत आहे. यंदा पाऊस लांबल्याने मातीच्या पणती कमी प्रमाणात आल्या आहेत. दिवाळीपर्यंत किती येतील याचाही अंदाज नाही. त्या बनवून सुकवणे मग त्यावर रंगकाम करणे याला बराच कलावधी लागत असल्याने मातीच्या पणतींमध्ये नाविन्य किती असेल हे आता सांगू शकत नाही, असे विक्रेत्यांनी सांगितले. यंदा चिनी मातीच्या पणत्या विक्रीसाठी आणणार नसल्याची भूमिका बाजारपेठेतील काही विक्रेत्यांनी घेतली आहे.बाजारात रंगीबेरंगी आणि आकर्षक पणत्या आल्या असल्या तरी काही हौशी महिला, तरुणी घरी मातीच्या पणत्या नेऊन त्या आपल्या कल्पकतेने सजवतात. सध्या हा ट्रेण्ड वाढत आहे. आपण सजवलेली पणती दारात लावण्याचा वेगळाच आनंद मिळत असल्याने अनेक महिला हा पर्याय निवडत आहेत. पंचमुखी, कोयरी, गोल पणत्याही ठाणेकर रंगकामासाठी घेऊन जातात, असे माणिक शहा यांनी सांगितले. रंगवल्यावर या एका पणतीची किंमत ४० रुपये होते. मी हौस म्हणून पणत्या सजवते. आॅर्डरनुसारही सजवून देते. एम्बॉसिंग पणत्यांना, मोर, स्टोन, फुलांचा इफेक्ट देऊन पणत्या सजवते, असे पूजा धुरी यांना सांगितले.>एम्बॉसिंगच्या पणत्या अ‍ॅक्रॅलिक, फॅब्रिक कलरप्रमाणे सध्या एम्बॉसिंगने रंगविलेल्या पणत्यांची चलती आहे. हौशी महिला किंवा तरुणी सध्या या प्रकारच्या पणत्या तयार करण्यात गुंतल्या आहेत. एम्बॉसिंग पणती रंगविण्याचे टेक्निक वेगळे आहे. त्यामुळे या पणत्यांचे दर जास्त आहेत. एम्बॉसिंग हे पावडर स्वरुपात असल्याने पणतींवर वापरताना थिनरमध्ये मिश्रण करुनच वापरले जाते. काहीजण पणतीला आधी फॅब्रिक कलर देऊन मग त्यावर एम्बॉसिंग वापरतात. त्यामुळे पणतीला इफेक्ट चांगला येतो. एम्बॉसिंग पणती उठावदार असल्याने ती जास्त सजविण्याची गरज नसते असे पूजाने सांगितले.