शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

वधू@५३ तर वर@५५... झाले शुभमंगल

By admin | Updated: March 4, 2016 01:43 IST

‘म्हणतात ना, प्रेमाला वयाचे बंधन नसते,’ त्याचाच प्रत्यय गुरुवारी आला. ३० वर्षांहून अधिक काळ परस्परांवर जिवापाड प्रेम करणारे एक जोडपे पन्नाशी उलटल्यावर गुरुवारी विवाहबंधनात अडकले.

ठाणे : ‘म्हणतात ना, प्रेमाला वयाचे बंधन नसते,’ त्याचाच प्रत्यय गुरुवारी आला. ३० वर्षांहून अधिक काळ परस्परांवर जिवापाड प्रेम करणारे एक जोडपे पन्नाशी उलटल्यावर गुरुवारी विवाहबंधनात अडकले. निमित्त होते सामूहिक विवाह सोहळ्याचे. त्याचा मुहूर्त साधत तब्बल १०८ जोडपी लग्नाच्या बेडीत अडकली. या जोडप्यांबरोबर दृष्टिहीन, दिव्यांग, आदिवासी, गरीब जोडप्यांवरही अक्षता पडल्या. हिंदी भाषा एकता परिषद, राजस्थानी सेवा समिती आणि ब्रह्म फाउंडेशनतर्फे ठाण्याच्या मॉडेल मिल मैदानात हा सोहळा पार पडला. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून ही जोडपी येथे आली होती. सोहळ्याला प्रारंभ होण्याआधी विधिवत पूजा करण्यात आली. आचार्य सुभाष शर्मा यांच्या उपस्थितीत हा सामूहिक विवाह सोहळा झाला. अनेकांचे नातेवाईक या वेळी उपस्थित होते.पन्नाशी ओलांडलेल्या एका जोडप्याने सांगितले की, गेली ३० वर्षे आम्ही परस्परांवर प्रेम केले. मात्र मुलीच्या घरातून लग्नाला विरोध होता. लग्न केले तर जीव देऊ, अशी धमकी तिच्या माता-पित्याने दिली होती. त्यामुळे इतकी दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यावर आता विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. यातील वराचे वय ५५ वर्षे तर वधूचे वय ५३ वर्षे आहे. ज्यांना नातलग नव्हते, त्यांच्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्यांनी कन्यादानासह विधी पार पाडले. दृष्टिहीन, आदिवासी, दिव्यांग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशी १०८ जोडपी एकाच मांडवात विवाहबद्ध झाली. संस्थेतर्फे या जोडप्यांना भांडी, मंगळसूत्र, कपडे आदी वस्तू देण्यात आल्याचे संयोजक अ‍ॅड. बी.एल. शर्मा यांनी सांगितले. या वेळी ओमप्रकाश शर्मा व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.दृष्टिहीन जोडपे झाले विवाहबद्धसुनीता अहिरे (३०) आणि गणेश शिंदे (४०) हे दृष्टिहीन जोडपेही या सोहळ्यात विवाहबद्ध झाले. उशिरा का होईना आमचे लग्न होत आहे, याचा आनंद असल्याची भावना या जोडप्याने व्यक्त केली. आमच्या आईवडिलांनीच हे लग्न ठरविले होते, असे सांगत सुनीता म्हणाली, माझ्या वडिलांचे निधन झाल्याने दोन वर्षे हे लग्न लांबले. सुनीता ही नगरची असून गणेश मुंबईचा आहे. सुरुवातीला आम्हाला अशा पद्धतीचा सोहळा होणार आहे, याची कल्पना नव्हती. परंतु, ओळखीतून समजल्यावर लगेच नोंदणी केली. माझ्या भावाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. माझेही लग्न सामूहिक विवाह सोहळ्यातच लागले आहे. हा सोहळा हाच चांगला योग असल्याने या दोघांचा विवाह येथे लावण्याचे निश्चित केले. - कामिनी जोबनपुत्रा, वराची बहीण