शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

लाचलुचपतचा सापळा होतोय सैल, नियोजनबद्ध कारवाईनंतरही पोलीस दलातील आरोपी सुटतात निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 2:36 AM

विशाल शिर्के पुणे : पोलीस दलातीलच लाचखोर अधिकारी आणि कर्मचाºयांना मोठ्या शिताफीने पकडणाºया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा पुढील कारवाईत सैल होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या दहा वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७६ अधिकारी आणि कर्मचाºयांवर कारवाई केली असली, तरी त्यांतील केवळ ८ जणांनाच शिक्षेपर्यंत पोहोचविण्यात यश आले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे ...

विशाल शिर्के पुणे : पोलीस दलातीलच लाचखोर अधिकारी आणि कर्मचाºयांना मोठ्या शिताफीने पकडणाºया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा पुढील कारवाईत सैल होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. गेल्या दहा वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७६ अधिकारी आणि कर्मचाºयांवर कारवाई केली असली, तरी त्यांतील केवळ ८ जणांनाच शिक्षेपर्यंत पोहोचविण्यात यश आले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे पोलीस दलातील कर्मचारी अधिकाºयांवरदेखील वेळोवेळी कारवाई केली जात असल्याचे प्रकार वरचेवर पाहायला-वाचायला मिळतात. पुढे नक्की या कारवाईचे होते काय, याबाबत फारसे पुढे येत नाहीत. एखाद्या कारवाईत तर एकाच प्रशिक्षण वर्गात असूनदेखील आपल्या वर्गमित्रावर कारवाई केल्याचीदेखील उदाहरणे पोलीस दलात आहेत. अगदी पोलीस उप अधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षकांसारख्या अधिकाºयांवरदेखील कारवाई झाली आहे. कारवाईचा आकडा पाऊणशतकी असला, तरी त्यातील दोन आकडी व्यंक्तीवरील गुन्हेदेखील सिद्ध करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले नाही. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते अजहर खान यांनी उघड केलेल्या माहितीवरून ही बाब समोर आली आहे.पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २००७ पासून १ पोलीस उप अधीक्षक दर्जाचा अधिकारी, ६ पोलीस निरीक्षक, ७ सहायक पोलीस निरीक्षक, १२ पोलीस उपनिरीक्षक आणि २३ पोलीस हेड कॉन्स्टेबलवर कारवाई केली आहे. उर्वरित करावाया या सहायक फौजदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई यांच्यावरदेखील कारवाई झाली आहे. यातील १ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि सहायक फौजदार (असिस्टंट सब इनिस्पेटक्टर) प्रत्येकी १, पोलीस हेडकॉन्स्टेबल ३ आणि २ पोलीस नाईक दोषी ठरले आहेत. यातील ३५ जणांना निर्दोष सोडण्यात आले असून, ३३ प्रकरणे अजून प्रलंबित आहेत.मुळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ही योजनाबद्ध असते. त्यामुळेत त्यांच्या कारवाईला, सापळा रचून केलेली कारवाई म्हणतात. ही कारवाई करताना नोटेवर अँथ्रासीन पावडर लावली जाते. आरोपीने नोटांना स्पर्श केल्यास त्याच्या बोटांना ही पावडर लागते. त्यामुळे परस्थितिजन्य पुरावादेखील भक्कम होतो. म्हणजेच या विभागाच्या कारवाईतून सहजासहजी सुटणे अशक्य व्हायला हवे. मात्र, या नियोजनबद्ध कारवाईचे शिक्षेत रूपांतर होण्याचे प्रमाण अगदीच किरकोळ म्हणावे असेच आहे.दहा वर्षांत १९ टक्के आरोपींनाच शिक्षागेल्या दहा वर्षांत ७६ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांवर कारवाई करण्यात आली असून, त्यातील ३५ जणांना निर्दोष सोडण्यात आले आहे. तर, ८ आरोपींचा दोष सिद्ध झाला आहे. तसेच ३३ प्रकरणे प्रलंबित आहे. म्हणजेच सुनावणी पूर्ण झालेल्या ४३ पैकी ८ जणांना शिक्षा झाली आहे. शिक्षेचे हे प्रमाण १८.६० टक्के इतकेच आहे.अगदी तांत्रिक त्रुटींमुळे न्यायालयातून अनेक आरोपी निर्दोष सुटत आहेत. म्हणजे, पंचनाम्यात पँटच्या खिशातून की शर्टच्या खिशातून पैसे दिले असा उल्लेख असतो. उलट तपासणीत अनेकदा पंच, तक्रारदार गोंधळतात. अशा बारीकसारीक गोष्टींचा आरोपींच्या वकिलांकडूनउलट तपासणीत कीस पाडला जातो. संशयाचा फायदा मिळून अनेक आरोपी सुटतात. पुणे विभागात गेल्या वर्षी आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ३५ टक्के इतके होते. शिक्षेचे प्रमाण हे राज्यात सर्वाधिक असेल.- जगदीश सातव, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागशिक्षेचे प्रमाण वाढलेयाबाबत काही अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना म्हणाले, की पूर्वी पंच, तक्रारदार फितूर व्हायचा. तसेच, अनेकदा तपासात कायदेशीर बाबींमध्ये त्रुटी राहायची. त्याचा फायदा संबंधिताला होत असे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वीपर्यंत आरोपींना त्याचा काहीसा लाभ होत होता. आता, या त्रुटी जवळपास राहत नाहीत. तसेच, फितूर होणाºया तक्रारदारांवरही न्यायालयाने कडक कारवाई केल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे शिक्षेच्या प्रमाणात निश्चितच वाढ होतआहे.