शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरोवर परिसरातच दारू भट्टी!

By admin | Updated: March 15, 2016 02:18 IST

संरक्षित लोणार सरोवराकडे वन विभागाचे दुर्लक्ष, नियमांचे उल्लंघन!

लोणार (जि. बुलडाणा) : सरोवराच्या चारही बाजूने १00 मीटरचा परिसर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाद्वारे नुकताच पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित केला; मात्र सरोवरापासून काही मीटर अंतरावर वन्यजीव अभयारण्य परिसरात गावठी दारूची भट्टी मांडण्यात आली आहे. या भट्टीतून अनेक दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर गावठी दारू तयार करून ती विक्री होत असल्याचे वास्तव १४ मार्च रोजी ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे. येथील निसर्गनिर्मित खार्‍या पाण्याच्या लोणार सरोवराचे आणि वन्य जीव अभयारण्याच्या पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने शासन स्तरावरून मोठे पाऊल उचलले जाते; मात्र ज्या विभागावर वन व पर्यावरण संरक्षणाची मुख्य जबाबदारी आहे, त्याच वनविभागाकडून पर्यावरणास हानी पोहोचविणार्‍या या गावठी दारूच्या भट्टीकडे सर्रास डोळेझाक केली जाते. या परिसरात अनेक दिवसांपासून गावठी दारू निर्मिती करण्याच्या भट्टी लावण्यात आल्या असून, त्याचा वन्य जीव अभयारण्यासह खार्‍या पाण्याच्या सरोवराला धोका निर्माण झाला आहे. या हातभट्टीत तयार केलेली दारू रात्रीच्या वेळी वितरित केली जाते. दुर्लक्षित असलेल्या मार्गावर या हातभट्टी सुरू असते. लोणार सरोवर आणि वन्य जीव अभयारण्याचे पर्यावरणदृष्ट्या संरक्षण करण्याची मुख्य जबाबदारी वन विभागाची असताना या परिसरात गावठी दारू निर्माण करणार्‍या हातभट्टय़ा लागल्या तरी कशा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण लोणार सरोवराचे जतन आणि संवर्धनासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून १00 मीटर परिसर इकोसेन्सिटीव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे या परिसरात नियमानुसार नवीन खोदकाम अथवा बांधकाम करता येत नाही; मात्र गावठी दारू बनविणार्‍या हातभट्टय़ा कशा लागल्या, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. असे केले स्टिंग ऑपरेशनलोकमत चमू १४ मार्च रोजी दुपारी ३.३0 वाजता गुपित कमळजा मातेच्या दर्शनासाठी जात असताना सरोवरापासून ५0 मीटर अंतरावर परिसरातील झुडुपामध्ये गावठी दारूच्या हा तभट्यांचा धूर दिसला, तसेच दारूच्या मोहा सडव्याचा वास आला. त्या वासावरून दारू अड्ड्याच्या ठिकाणी पोहोचून पाहणी केली असता, तेथे दारू, मोहा सडव्याचे दोन टँक, दारूचे बॅरल, पाण्याची टाकी, दारू भट्टी आदी आढळून आले; मात्र दारू काढणारे इसम त्याठिकाणी नव्हते.वन्य जीव अभयारण्यात गावठी दारू निर्माण करणार्‍या हातभट्टय़ांमुळे परिसरात दुर्गंंधी पसरली आहे. याचा पशु-पक्ष्यांवर विपरित परिणाम होत आहे. गावठी दारू निर्मिती करताना त्यातून निघणारा मोहा सडव्याचे भरलेले ड्रम या परिसरात आढळून येतात. या ठिकाणी चालतो दारू अड्डा सरोवराच्या दक्षिण दिशेला व गुपित कमळजा मातेच्या मंदिराजवळील वन्य जीव अभयारण्याच्या परिसरातील घनदाट झाडीत हा दारू अड्डा चालत असल्याचे दिसून आले; मात्र या परिसरात वन विभागाचे कर्मचारी फिरकत नसल्याने दारू अड्डाचालकांना अभय मिळत आहे.