शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिवमंदिरात प्रेमीयुगुलाचं विषप्राशन.. दोघांचीही प्रकृती चिंताजनक !

By admin | Updated: May 31, 2016 21:01 IST

येथील घाटाच्या दरीतील शिवमंदिरामध्ये प्रेमीयुगुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

ऑनलाइन लोकमत

शामगाव (सातारा), दि.31 -  येथील घाटाच्या दरीतील शिवमंदिरामध्ये प्रेमीयुगुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित युवक व युवतीला उपचारार्थ कऱ्हाडच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शामगाव घाटातील दरीमध्ये प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिरात दररोज सकाळी भाविक दर्शनासाठी येतात. परिसरातील ग्रामस्थांसह मार्गावरून प्रवास करणारे प्रवासीही आवर्जून या मंदिराला भेट देतात. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शामगावातील एक नवदाम्पत्य देवदर्शनासाठी मंदिरात गेले होते. नवदाम्पत्यासोबत काही युवक व युवतीही होत्या. दाम्पत्य मंदिरात पोहोचले त्यावेळी त्याठिकाणी एक युवक व युवती बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. युवक मंदिराच्या शेडमध्ये तर युवती शेडमधून बाहेर काही अंतरावर पडली होती. दोघांच्याही तोंडातून फेस येत असल्याने त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मंदिरात आलेले नवदाम्पत्य व इतर युवकांनी याबाबतची माहिती मसूर पोलिसांना दिली. पोलिसही तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी त्या युवक व युवतीची प्राथमिक तपासणी केली असता ते बेशुद्ध असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांना उपचारार्थ तातडीने कऱ्हाडच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घाटातील मंदिरासमोर संबंधित युवकाची दुचाकी आढळली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबतची नोंद मसूर पोलिस दूरक्षेत्रात झाली आहे. अल्पवयीन मुलगी दहावीची !आत्महत्येचा प्रयत्न केलेली मुलगी अल्पवयीन असल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. संबंधित मुलीने दहावीची परीक्षा दिली आहे. सोमवारी सायंकाळी संबंधित युवक व ती मुलगी घरात कोणास काहीही न सांगता निघून गेले होते. नातेवाइक त्यांचा शोध घेत असतानाच मंगळवारी सकाळी त्या दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले.