शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

करुळ घाटात संरक्षक कठडा ढासळून रस्त्यालगत भगदाड; एकेरी वाहतूक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 00:30 IST

आठवडाभर कोसळणा-या पावसामुळे करुळ घाटातील संरक्षक कठडा ढासळून रस्त्यालगत भगदाड पडले आहे.

- प्रकाश काळे वैभववाडी(सिंधुदुर्ग): आठवडाभर कोसळणा-या पावसामुळे करुळ घाटातील संरक्षक कठडा ढासळून रस्त्यालगत भगदाड पडले आहे. त्यामुळे भगदाडाभोवती मातीचे ढिगारे ओतून घाटातून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना हाती न घेतल्यास रस्ता खचून वाहतूक ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.करुळ घाटातील 'यू' आकाराच्या वळणाच्या अलिकडे सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील दगडी बांधकाम असलेला संरक्षक कठडा अतिवृष्टीमुळे शनिवारी दुपारी ढासळला. त्यामुळे रस्त्यालगत भगदाड पडले आहे. कठडा ढासळून भगदाड पडल्याचे कळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीचे ढिगारे ओतून खचलेला भाग संरक्षित केला आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे.भगदाड पडलेल्या ठिकाणी खोल दरी असून त्या भागात सद्या दिवसरात्र दाट धुके असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. अन्यथा पावसामुळे रस्ता खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास करुळ घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची चिन्हे दिसत आहेत. ढासळलेल्या कठड्याच्या जागी भगदाड वाढू नये याची खबरदारी सार्वजनिक बांधकाम विभाग कशा प्रकारे घेणार हे पाहावे लागणार आहे.