शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंध तोडणे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 09:06 IST

High Court : बुलडाणा जिल्ह्यातील विवाहित जीवनचे पीडित मनीषासोबत विवाहबाह्य संबंध होते. त्यावेळी मनीषा अविवाहित होती. जीवनचे पत्नीसोबत भांडण सुरू होते.

- राकेश घानोडे

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणामध्ये आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला. प्रेयसीने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केले म्हणून तिच्याविरुद्ध प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे या निर्णयात स्पष्ट केले.

बुलडाणा जिल्ह्यातील विवाहित जीवनचे पीडित मनीषासोबत विवाहबाह्य संबंध होते. त्यावेळी मनीषा अविवाहित होती. जीवनचे पत्नीसोबत भांडण सुरू होते. त्याचा घटस्फोट झाला नसल्याने तो मनीषासोबत लग्न करण्यास असमर्थ होता. मनीषाने त्याचे मन वळविण्याचा बराच प्रयत्न केला; पण तो पुढे गेला नाही. परिणामी, मनीषाने जीवनसोबतचे संबंध तोडले.

...तर मनीषावर अन्यायवादग्रस्त एफआयआर कायम ठेवल्यास मनीषावर अन्याय होईल, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. जीवन पत्नीसोबतच्या भांडणामुळे आधीच मानसिक तणावात होता. मनीषाने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केल्याचा धक्का तो सहन करू शकला नाही, असा जीवनच्या आईचा आरोप होता. न्यायालयाने यासाठी मनीषाला दोष दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. मनीषा लग्न करण्यास तयार होती. जीवनने तिला सहकार्य केले नाही. जीवनने आत्महत्या करावी, अशी कोणतीही प्रत्यक्ष कृती मनीषाने केली नाही, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

टॅग्स :Courtन्यायालय