शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

ब्रेकफेलमुळे आयुष्यालाच ‘ब्रेक’...

By admin | Updated: June 8, 2016 03:31 IST

सुट्टी संपवून मुंबईला परतण्याच्या तयारीत असतानाच १७ जणांवर काळाने घाला घातला.

मनीषा म्हात्रे,

मुंबई- सुट्टी संपवून मुंबईला परतण्याच्या तयारीत असतानाच १७ जणांवर काळाने घाला घातला. आरक्षित केलेल्या बसचे ब्रेक फेल झाल्याने दोन तास बसची वाट पाहण्यापेक्षा आलेल्या बसमधून जाण्यासाठी २३ प्रवासी तयार झाले. एजंटने देखील बस भरलेली असतानाही पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी प्रवाशांना बसमध्ये कोंबले. याच निष्काळजीपणामुळे क्षमतेबाहेर भरलेल्या प्रवाशांना जीव गमवावा लागला. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर पनवेलजवळील शेडुंग गावात रविवारी पहाटे बस-कारच्या भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला. तर ४७ प्रवासी जखमी झाले. मृतांमध्ये १० महिला, ६ पुरुष आणि एका २ वर्षाच्या चिमुरडीचा समावेश आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये बसलेल्या २३ प्रवाशांचे बुकींग हे दुसऱ्या बसमध्ये करण्यात आले होते. मुंबईहून येणारी बस त्यांना साताऱ्यातून मुंबईकडे घेऊन येणार होती. दरम्यान घटनेच्या आदल्या दिवशी मुंबईच्या प्रवाशांना साताऱ्याला नेत असताना त्या बसचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे गाडी मध्येच थांबवून गाडीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करावे लागले. दुसऱ्या दिवशी साताऱ्यात ज्या स्पॉटहून मुंबईसाठी गाडी सुटणार होती तेथे पोहोचणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे बसची वाट पाहत असलेल्या २३ प्रवाशांना दोन तास उशीर होणार होता. अशात तेथील एजंटने या प्रवाशांना निखिल ट्रॅव्हलच्या बसमध्ये कोंबले. दोन तास ताटकळत राहण्यापेक्षा लवकर घरी पोहोचता येईल, म्हणून या प्रवाशांनी त्यांना होकार दिला. अशात ५९ सीटची जागा असताना त्यात जास्तीच्या प्रवाशांना कोंबण्यात आले. यातील सात जणांना चक्क चालकाच्या बाजूच्या सीटवर बसविण्यात आले. या अपघातात या सात जणांसह १७ जणांचा मृत्यू झाला. ज्या प्रवाशांचे दुसऱ्या बसमध्ये बुकींग झाले होते.बस मालक संजय गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या गाडीवरचा चालक इक्बाल शेख हा अनुभवी असून उत्तम चालक आहे. गेल्या वर्षभरापासून माझ्याकडे काम करतोय. केवळ वाटेत उभ्या असलेल्या वाहनाला धक्का लागू नये, म्हणून त्याने गाडी दुसऱ्या दिशेने वळविली. आणि अपघात झाला असे त्यांचे म्हणणे आहे. ‘तो’चालकही कारवाईच्या कचाट्यातया अपघातात स्विफ्ट डिझायर कारचे मालक अमरजित दासयांची पत्नी कोमल गंभीर जखमी असून त्यांच्यावर मुलुंडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दास यांनी चुकीच्या पद्धतीने मध्येच गाडी उभी केली होती. त्यामुळे हा अपघात घडला. त्यामुळे त्यांच्या पत्नीची प्रकृती लक्षात घेऊन दास यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली.