शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भाकरीचे पीक करपले!

By admin | Updated: August 29, 2014 03:11 IST

लांबलेल्या पावसामुळे भात, ज्वारी, बाजरी, नाचणी या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे : लांबलेल्या पावसामुळे भात, ज्वारी, बाजरी, नाचणी या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाकरीचे पीक करपल्याचे चित्र असून, भाताचे देखील नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. जुलै महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत पावसाअभावी राज्यातील पेरण्या रखडल्या होत्या. त्याचा फटका खाद्यान्न पिकाला बसला आहे. सोयाबीन, मका, कापूस, ऊस ही पिके वगळता इतर पिकांच्या पेरण्यांना फटका बसला आहे. राज्याचे खरीपाचे सरासरी क्षेत्र १३४.७० लाख हेक्टर असून, त्यापैकी १२६.५० लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यात अ‍ॅगस्ट महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत सरासरी ८७०.५० मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा केवळ ५६५ मिलिमीटर (६४.९ टक्के) पाऊस झाला. त्यातही जालना, बीड, लातुर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात सरासरीच्या केवळ २५ ते ५० टक्के पाऊस झाल्याने पेरण्यांची स्थिती बिकट आहे. भाताचे सरासरी क्षेत्र १४ लाख ९२ हजार ६०० हेक्टर असून त्यापैकी १२ लाख ७२ हजार ६०० (८५ टक्के) हेक्टरवरील पेरण्या झाल्या आहेत. ज्वारीचे क्षेत्र ११ लाख ४४ हजार ४०० हेक्टर असून, ४ लाख ३३ हजार ८०० (३८ टक्के) हेक्टर, तर बाजरीची ११ लाख ३३ हजार ८०० पैकी ५ लाख ८२ हजार ८०० हेक्टरवर (५१ टक्के) पेरणी झाली आहे. नाचणीचे क्षेत्र १ लाख २५ हजार ९०० हेक्टर असून, ७६ हजार १०० (६० टक्के) हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याचे क्षेत्र ६ लाख हेक्टरवरून ७ लाख ४० हजार ८०० (१२३ टक्के) हेक्टरपर्यंत वाढले आहे. तूर, मूग, उडीद व इतर कडधान्यांचे सरासरी क्षेत्र २२ लाख ४७ हजार २०० हेक्टर असून, १५ लाख ५६ हजार ७०० हेक्टरवरील (६९ टक्के) पेरणीची कामे उरकली आहेत. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २७ लाख ९९ हजार ४०० हेक्टरवरून ३६ लाख ७० हजार ३०० (१३१ टक्के) हेक्टरवर पोचले आहे. कापसाचे क्षेत्र ३३ लाख ५६ हजार ४०० हेक्टरवरून ४० लाख २९ हजार २०० (१२० टक्के) हेक्टरवर गेले आहे. ऊसाचे क्षेत्र ९ लाख ५५ हजार १०० हेक्टरवरुन ११ लाख ७० हजार ७०० हेक्टरवर (१२३ टक्के) गेले आहे. (प्रतिनिधी)