शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

धाडसी युवकांनी वाचविला विद्यार्थ्याचा जीव

By admin | Updated: May 28, 2015 00:59 IST

कापशी येथील घटना : विहिरीत पाणी भरताना पाय घसरला

सूर्यकांत निंबाळकर - फलटण  कापशी ता.फलटण येथे विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेला अकरावीतील मुलगा विहिरीत बुडाला. मात्र दोन मुलांनी जीव धोक्यात घालून त्या मुलाला सुखरुप बाहेर काढले. ग्रामस्थांनी त्या दोन्ही मुलांचा सत्कार करून समाजापुढे आदर्श निर्माण केला.याबाबत अधिक माहिती अशी की, अकरावीत शिकणारा अजय लांडगे (वय १७ सध्या रा. चिंचवड पुणे, मूळ रा. बारामती) हा आपल्या बहिणीकडे सुटीसाठी आला आहे. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास अजय हा सात वर्षाच्या मुलीसह विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला होता. मात्र त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला. आणि पहाता-पहाता तो बुडाला. विहिरीच्या शेजारी उभ्या असणाऱ्या रोहिणी मसुगडे छोट्या मुलीच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. त्या मुलीचा आवाज ऐकून मनोज जाधव (वय ३५ रा. कापशी ता. फलटण) हा धावत आला. मात्र अजय तोपर्यंत विहिरीत बुडाला होता. पाणी शांत होऊन पाण्यावर बुडबुडे येत होते. अखेर मनोजने क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उडी टाकली. काही वेळानंतर मनोजने अजयला विहिरीच्या तळातून बाहेर काढले. परंतु मनोजची दमछाक झाल्याचे प्रशांत भिलारे (वय ३६ रा. कापशी) या युवकाच्या लक्षात आल्यानंतर त्यानेही विहिरीत उडी टाकून अजयला विहिरीबाहेर काढण्यास मदत केली. विहिरीबाहेर अजयला काढल्यानंतर तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर तत्काळ अजयला रुग्णालयात हलविण्यात आले. काही तासानंतर अजयची तब्बेत अगदी ठणठणीत झाली. ग्रामस्थांकडून दोघांचाही गौरवमनोज जाधव व प्रशांत भिलारे या युवकांनी आपला जीव धोक्यात घालून विद्यार्थ्याचा जीव वाचविला. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच ग्रामसभा बोलावून गावाने या धाडसी युवकांच्या कामगिरीचा गौरव केला. यावेळी सरपंच सत्यवान बोबडे, उपसरपंच लता काकडे, दीपक कदम, अमोल शिंदे, तलाठी आढाव, ग्रामसेवक व्ही. आर. गफार, जनार्दन गार्डे, राहुल पवार तसेच कापशीचे ग्रामस्थ उपस्थित होते.