शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

बीपीटीत ३०० कोटींचे क्रुझ टर्मिनल : नितीन गडकरींची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 05:13 IST

 मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ३०० कोटी रुपये खर्चून क्रुझ टर्मिनल उभारण्याच्या कामाची सुरुवात येत्या १५ दिवसांत करण्यात येईल. येत्या दोन वर्षांत हे काम पूर्ण होणार असून नंतर त्याचा विस्तारही केला जाईल. मुंबईच्या समुद्रात जलवाहतूक सुरू करण्यासाठी केंद्र सरकार ५० टक्के आर्थिक भार उचलेल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि ...

 मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ३०० कोटी रुपये खर्चून क्रुझ टर्मिनल उभारण्याच्या कामाची सुरुवात येत्या १५ दिवसांत करण्यात येईल. येत्या दोन वर्षांत हे काम पूर्ण होणार असून नंतर त्याचा विस्तारही केला जाईल. मुंबईच्या समुद्रात जलवाहतूक सुरू करण्यासाठी केंद्र सरकार ५० टक्के आर्थिक भार उचलेल, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी केली.केंद्र सरकारचे पर्यटन मंत्रालय, केंद्रीय जहाज मंत्रालय, महाराष्ट्र शासन, सागरमाला, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतात क्रुझ पर्यटनाचा उदय’ या विषयावर आयोजित परिषदेत आणि नंतर आयोजित पत्र परिषदेत गडकरी बोलत होते. क्रुझ पर्यटनाद्वारे सध्या देशाला केवळ ७१२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. येत्या पाच वर्षांत ते ३५ हजार कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. सध्याची २ लाख प्रवासी संख्या पाच वर्षांनी ४० लाखांवर गेलेली असेल आणि सव्वालाख लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असे गडकरी म्हणाले.ठाणे येथे सागरी वाहतूक करण्याचा प्रस्ताव तेथील महापालिकेने तयार केला आहे. तेथील महापौर, आयुक्त आणि खासदारांशी आपली चर्चा झाली आहे. २ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात केंद्र सरकार एक हजार कोटी रुपयांचा वाटा उचलेल. मुंबईत अशी वाहतूक सुरू करण्यासाठीही ५० टक्के योगदान देईल. मुंबईत सागरी वाहतूक सुरू व्हावी, ही आपली वैयक्तिक इच्छा असल्याचे गडकरी म्हणाले.या वेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खा. अरविंद सांवत, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया, मुंबई फर्स्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी, युके कार्निव्हलचे अध्यक्ष डेव्हिड डिंगल, केंद्र सरकारच्या जहाज मंत्रालयाचे सचिव रविकांत, केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सचिव रश्मी वर्मा आदी उपस्थित होते.मेरीटाइम युनिर्व्हसिटीचे रत्नागिरीत उपकेंद्रचेन्नई येथील मेरीटाईम युनिर्व्हसिटीचे उपकेंद्र रत्नागिरी येथे सुरू करण्यात येईल आणि तेथे सागरी पर्यटनाशी संबंधित विविध अभ्यासक्रम चालविले जातील. त्यासाठी रत्नागिरी आपल्या विभागाने २० एकर जमीन खरेदी केली असल्याचे गडकरी यांनी पत्रकारांना सांगितले.देशातील क्रुझ पर्यटनासाठी गृहबंदर (होमपोर्ट) म्हणून आमची निवड झाली याचा आनंद आहे. क्रुझ केंद्र म्हणून राज्याला विकसित करण्यासह धोरणे आखण्यासाठी नौवहन मंत्रालयाशी परस्पर सहकार्य करण्यात येणार आहे. स्थानिक आणि परदेशी पर्यटकांसाठी क्रुझ पर्यटनात मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. क्रुझ पर्यटन हे ‘गेम चेंजर’ असल्याने मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळणार आहे. - जयकुमार रावल, पर्यटनमंत्रीक्रुझ पर्यटनासाठी मुंबईची निवड होणे गौरवास्पद आहे. राज्य आणि केंद्रासह उर्वरित संस्थांशी समन्वय साधत यासाठी अधिक प्रयत्न केले जातील. विशेषत: मुंबई पोर्ट ट्रस्ट याकामी अग्रभागी आहे. क्रुझ पर्यटनाद्वारे प्रवाशांना उत्तम सेवा सुविधा दिल्या जातील. - संजय भाटिया, अध्यक्ष, मुंबई पोर्ट ट्रस्ट