शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘आपले सरकार’च्या बैठकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 05:58 IST

गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याचा आरोप करत संगणक परिचालकांनी ७ मे रोजी मंत्रालयात होणाऱ्या ‘आपले सरकार’च्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायती डिजिटल तसेच पेपरलेस करण्याचे सरकारचे स्वप्न कागदावरच राहणार असल्याचे दिसत आहे.

मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याचा आरोप करत संगणक परिचालकांनी ७ मे रोजी मंत्रालयात होणाऱ्या ‘आपले सरकार’च्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायती डिजिटल तसेच पेपरलेस करण्याचे सरकारचे स्वप्न कागदावरच राहणार असल्याचे दिसत आहे.राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे म्हणाले की, गेल्या १७ महिन्यांपासून ‘आपले सरकार’ सेवा केंद्र या प्रकल्पाचे काम सुरळीत झालेले नाही. काम करूनही संगणक परिचालकांना वर्ष-वर्ष मानधन मिळत नाही. अशा परिस्थितीत एका खासगी कंपनीने या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू केल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. संगणक परिचालकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी आश्वासन दिले, पण त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. त्यात ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी शासनाकडून बैठकीचे आयोजन करणे, म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया मुंडे यांनी व्यक्त केली आहे. म्हणूनच या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे त्यांनी सांगितले.‘आपले सरकार’ सेवा केंद्रासाठीचा निधी १४व्या वित्त आयोगातून देण्यास राज्यातील अनेक ग्रामपंचायतींचा विरोध आहे. त्यामुळे संगणक परिचालकांचे मानधन राज्याच्या अर्थसंकल्पातून करावे, यासाठी ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर संघटनेने धडक मोर्चाची हाक दिली होती. त्या वेळी ४ मार्च रोजी रात्री ११ वाजता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वर्षा निवासस्थानी पंकजा मुंडे आणि इतर अधिकाºयांसह संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. त्यात १ मेपासून ज्या ग्रामपंचायती निधी देणार नाहीत, तेथील संगणक परिचालकांचे संपूर्ण मानधन वेगळी योजना तयार करून ग्रामविकास विभाग देईल असेही आश्वासित केले.योजना कागदावरच!राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतींचे हस्तलिखित कामकाज बंद करून सर्व ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी ग्रामविकास विभागाने १ एप्रिल २०१८ ही तारीख ठेवलेली होती. मात्र १ मेनंतरही राज्यातील एकसुद्धा ग्रामपंचायत पेपरलेस होऊ शकलेली नाही. या ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे पेपरलेस ग्रामपंचायती करण्यास मोठी अडचण निर्माण झाल्याचा दावाही संघटनेने केला आहे.

टॅग्स :GovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार